Bizarre Theft : मंदिरात चोरी केली, पण तिथेच झोपला, सकाळी पुजाऱ्यांनी पाहिलं अन्...

Published : Apr 12, 2026, 09:01 AM IST
Kerala Thief Falls Asleep at Crime Scene

सार

Kerala Thief Falls Asleep at Crime Scene : केरळमधील एका मंदिरात चोरी करायला गेलेला चोर, चोरी केल्यावर थकल्यामुळे तिथेच झोपी गेला. सकाळी पुजारी मंदिरात आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या चोराला अटक केली आहे.

Kerala Thief Falls Asleep at Crime Scene: केरळमधील एका मंदिरातून एका चोराने ८,५०० रुपये चोरले, पण थकल्यामुळे तो तिथेच झोपी गेला. अखेर पोलिसांनी त्याला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.

चोरी करून मंदिरातच गाढ झोपला!

ही घटना अंबूरच्या कुडप्पनमूडू कुजुवल्वट्टम भगवती मंदिरात घडली. सेंथिल (४०) असं या आरोपीचं नाव असून तो मूळचा तामिळनाडूचा आहे. शुक्रवारी रात्री त्याने मंदिराचा दरवाजा तोडून कार्यालयातील ८,५०० रुपये चोरले. पण त्यानंतर त्याला इतकी झोप आली की तो तिथेच झोपी गेला.

पुजाऱ्यांनी सकाळी पाहिलं अन्...

शनिवारी पहाटे ५.३० वाजता पुजारी मंदिरात आले, तेव्हा त्यांना चोरी झाल्याचं लक्षात आलं. इतकंच नाही, तर चोर चोरीच्या ८,५०० रुपयांसोबत तिथेच झोपलेला दिसला. त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन सेंथिलला अटक केली. त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

NIRF Ranking: भारतातील नंबर वन IIT कोणती? टॉप 10 संस्थांची लिस्ट
UPI Rules: UPI पेमेंटसाठी येतोय RBIचा 'गोल्डन अवर' नियम, काय आहे हे नवीन प्रकरण?