Plane Crash: विमान अपघाताच्या चौकशीवर मुलाचा सवाल, 'VSR' कंपनीवर कारवाईची मागणी

Published : Mar 02, 2026, 09:56 AM IST
Jay Pawar Demands Stricter Action on VSR Ventures After Fathers Plane Crash Report

सार

Jay Pawar Demands Stricter Action on VSR Ventures After Fathers Plane Crash Report: दिवंगत अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी वडिलांच्या विमान अपघाताच्या AIB चौकशी रिपोर्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

पवार यांनी AIB च्या प्राथमिक रिपोर्टवर उपस्थित केले प्रश्न

दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी वडिलांच्या विमान अपघाताच्या चौकशी रिपोर्टवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो (AIB) ने सादर केलेल्या प्राथमिक रिपोर्टवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जर VSR Ventures या कंपनीकडून सुरक्षेमध्ये काही त्रुटी आढळल्या, तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही जय पवार यांनी केली आहे.

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये जय पवार यांनी म्हटलं आहे की, "मी AIB ने सादर केलेला प्राथमिक रिपोर्ट वाचला आहे. हा रिपोर्ट पूर्णपणे आणि सखोलपणे तयार केलेला नाही, हे पाहून मला खूप दुःख आणि वेदना झाल्या. महाराष्ट्रातील जनतेला आणि या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं, त्या सर्व कुटुंबांना केवळ औपचारिक माहिती नको, तर सत्य, पारदर्शकता आणि सविस्तर उत्तरं मिळायला हवीत."

VSR Ventures वर कडक कारवाईची मागणी

डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने VSR Ventures च्या काही विमानांवर केलेल्या कारवाईवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "ज्या मुद्द्यांवरून DGCA ने VSR Ventures ची काही विमानं ग्राउंड केली आहेत, त्याच प्रकारच्या त्रुटी इतर विमानांमध्येही असू शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही."

सुरक्षेच्या नियमांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यास कठोर पावलं उचलण्याची मागणी करताना पवार म्हणाले, "जर सुरक्षेशी संबंधित नियमांमध्ये आणि प्रक्रियांमध्ये गंभीर चुका आढळल्या, तर केवळ काही विमानांपुरती कारवाई मर्यादित न ठेवता, VSR च्या संपूर्ण ताफ्याबाबत कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, गरज पडल्यास DGCA ने VSR च्या संपूर्ण विमान वाहतूक सेवेवर तात्पुरती बंदी घालण्याचा विचार करावा."

व्हिडिओ शेअर करत गंभीर हलगर्जीपणाचा आरोप

एका दुसऱ्या पोस्टमध्ये, जय पवार यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत विमान प्रवासादरम्यान झालेल्या हलगर्जीपणाचा आरोप केला आणि तातडीने कारवाईची मागणी केली. "या व्हिडिओमध्ये, VSR चे मालक रोहित सिंग हे विमान प्रवासादरम्यान मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले दिसत आहेत. हवेत असताना असा हलगर्जीपणा अजिबात स्वीकारार्ह नाही. ही अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बाब आहे."

"मी DGCA कडे या प्रकरणात तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करतो. जोपर्यंत संपूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत VSR ची सर्व विमानं तात्काळ ग्राउंड करावीत आणि रोहित सिंग यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. एका मुलाची ही तळमळ आहे... माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षेसाठी," असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : साडी नेसून, बिना शूज 1600 मीटरची धाव; महिलेचा व्हिडिओ व्हायरल, तिच्या जिद्दीचं कौतुक
IndiGo Flight Damage : १७,००० फुटांवर इंडिगो विमानाला हवेत धक्का, पुढच्या भागाचे नुकसान; सुरक्षित लँडिंग