
इंडिगो फ्लाइट इमर्जन्सी लँडिंग: देशाच्या एव्हिएशन उद्योगातील समस्या थांबायचे नाव घेत नाही. जुनी विमाने आणि बेजबाबदार कर्मचारी सतत प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. तर देखरेख करणारे गप्प बसले आहेत. एअर इंडियाचे अहमदाबाद-लंडन फ्लाइट उड्डाण केल्यानंतर अवघ्या ३२ सेकंदात क्रॅश झाल्यानंतर दिवसेंदिवस विविध फ्लाइट्समध्ये बिघाड होत असल्याचे समोर येत आहे. ताजी घटना इंडिगो फ्लाइटची आहे, ज्याला कमी इंधनामुळे इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. गुरुवारी इंडिगोच्या गुवाहाटी-चेन्नई फ्लाइटने बंगळुरूमध्ये इमर्जन्सी लँडिंग केले आहे.
हे विमान गंभीर इंधन संकटात (critically low fuel) होते. गंभीर परिस्थितीनंतर पायलट्सनी 'मेडे' कॉल केला. त्यानंतर पायलट्सनी बंगळुरूमध्ये सुरक्षित लँडिंग केले.
DGCA मधील जाणकार लोकांच्या मते, फ्लाइटला चेन्नईला पोहोचायचे होते, पण वाटेत इंधनाची कमतरता असल्याने पायलट्सना आपत्कालीन स्थिती जाहीर करावी लागली. सांगण्यात येत आहे की मेडे कॉलनंतर विमान तातडीने बंगळुरूला वळवण्यात आले, जिथे ते सुरक्षितपणे लँड झाले.
या गंभीर घटनेनंतर संबंधित पायलट्सना कामावरून काढण्यात आले आहे. Derostered आणि DGCA द्वारे चौकशी सुरू करण्यात आली आहे. जेव्हा एखाद्या फ्लाइटमध्ये सुरक्षेशी संबंधित गंभीर परिस्थिती निर्माण होते तेव्हा हा मानक कार्यपद्धतीचा भाग असतो.
इंडिगो एअरलाईन्सने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हिंडन विमानतळावरून थेट आठ प्रमुख भारतीय शहरांमध्ये उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. येत्या २० जुलैपासून ही सेवा सुरु होणार असून, ही दिल्ली-एनसीआर भागातील इंडिगोची दुसरी प्रमुख एअर कनेक्टिव्हिटी ठरणार आहे.
प्रादेशिक जोडणीला चालना
इंडिगोच्या या नव्या सेवा प्रादेशिक हवाई वाहतूक जाळ्याला अधिक बळ देणार आहेत. यामुळे गाझियाबाद, पूर्व दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील नागरिकांना वेगवान आणि सोयीची हवाई वाहतूक सुविधा मिळणार आहे.
इंडिगोचे ग्लोबल सेल्स प्रमुख विनय मल्होत्रा म्हणाले, "हिंडन येथील विस्तार हा आमच्यासाठी एक रणनीतिक निर्णय आहे. यामुळे लाखो लोकांना अतिरिक्त गेटवे उपलब्ध होणार आहे."
त्यांनी पुढे सांगितले की, "८ शहरांमध्ये ७० हून अधिक साप्ताहिक उड्डाणांमुळे प्रवास अधिक सुलभ होणार असून, व्यापार, व्यवसाय, आणि आर्थिक वाढीस चालना मिळेल."
‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर इंडिगोचे वक्तव्य
इंडिगोने एका पोस्टमध्ये म्हटले की, "हमें यह घोषणा करते हुए खुशी हो रही है कि हिंडन, उत्तर प्रदेश से सीधी उड़ानों की शुरुआत की जा रही है. इससे हमारे ग्राहकों के लिए हवाई यात्रा अधिक सुलभ होगी."
त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांचे विशेष आभार मानले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.