भारत-पाक संघर्षविरामानंतर अखिलेश यादव, उमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक नेत्यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या कोण काय म्हणाले

Published : May 10, 2025, 07:47 PM IST
akhilesh omar

सार

भारत आणि पाकिस्तानने सैनिकी कारवाया थांबवण्यावर एकमत साधले आहे आणि संघर्षविराम तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमुळे भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीवर आता संयमाची आणि शांतीची पातळी गाठली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी घोषणा केली की, भारत आणि पाकिस्तानने सैनिकी कारवाया थांबवण्यावर एकमत साधले आहे आणि संघर्षविराम तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. जाणून घेऊया कोण म्हणाले.

भाजपची ठाम भूमिका: “पाकिस्तानची गुस्ताखी जगाने पाहिली”

जम्मू-कश्मीरमधील भाजपचे नेते रविंदर रैना यांनी सांगितले की, “भारतीय सेनेने पाकिस्तानला त्यांच्या प्रत्येक नापाक कृतीची किंमत चुकवायला लावली आहे. मोदींच्या नेतृत्वात पाकिस्तान घुटणावर आलं आहे.”

भाजप खासदार गुलाम अली खटाना म्हणाले, “पहल्गाम हल्ल्याला आता न्याय मिळाला आहे. आम्ही युद्ध नको म्हणतो, पण नागरिकांच्या हत्या सहन करणार नाही.”

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखालील लष्करी कारवाईचं कौतुक करत सांगितले की, “ही भारताची तांत्रिक आणि धोरणात्मक विजय आहे.”

अखिलेश यादव यांचा संयमी संदेश: "शांती सर्वोच्च, पण सार्वभौमत्वही महत्त्वाचं"

समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी संघर्षविरामाचं स्वागत करत म्हटलं, “शांती सर्वोपरि आहे आणि सार्वभौमत्वही!” त्यांनी दोन्ही बाजूंनी संयम बाळगण्याचे आवाहन केले.

उमर अब्दुल्ला यांचे भावनिक मत: “हे आधी झालं असतं, तर जीव वाचले असते”

जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले, “संघर्षविरामाचं मी स्वागत करतो. हे काही दिवस आधी झालं असतं, तर अनेकांचे जीव वाचले असते. आता सरकारने जखमींना मदत करावी आणि नुकसानग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवावी.”

 

 

महबूबा मुफ्ती: “काश्मीरने सुस्कारा टाकला”

पीडीपी नेत्या महबूबा मुफ्ती म्हणाल्या, “भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा पहिला फटका काश्मीरलाच बसतो. संघर्षविरामामुळे लोकांनी सुस्कारा टाकला आहे. युद्ध काहीच सुटणं नाही. भारताने मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्यायला हवी.”

काँग्रेसची प्रतिक्रिया: “युद्ध नको, पण आतंकवादाविरुद्ध कठोर लढा हवा”

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी युद्धविरामाचं स्वागत केलं. तर खासदार शशी थरूर म्हणाले, “भारताने कधीच दीर्घकालीन युद्ध नको म्हटलं, पण आतंकवाद्यांना धडा शिकवला गेला, हेही खरं आहे.”

भारत-पाक संघर्षविरामानंतर राजकीय पटलावरून मिळालेल्या या प्रतिक्रिया एक गोष्ट स्पष्ट करतात. भारत शांततेसाठी कटिबद्ध आहे, मात्र त्याच वेळी आपल्या सार्वभौमत्वाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कुठलाही तडजोडीचा विचार केला जाणार नाही.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

NEET UG 2026 : अंतिम अभ्यासक्रम वेबसाईटवर जाहीर, NTA ने दिली माहिती
Face authentication: UPSC परीक्षेत आता डमी उमेदवाराची केवळ 10 सेकंदात ओळख पटणार