VIDEO : धावत्या बसमध्ये चालकाला हार्टअटॅक, कंडक्टरने वाचवले 35 प्रवाशांचे प्राण

Published : May 29, 2025, 09:11 PM IST
VIDEO : धावत्या बसमध्ये चालकाला हार्टअटॅक, कंडक्टरने वाचवले 35 प्रवाशांचे प्राण

सार

चालकांना हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटना वाढत असून, बस प्रवासही भयावह बनत चालला आहे. आता आणखी एका घटनेत वाहन चालवतानाच चालकाचा मृत्यू झाला आहे!

बंगळुरु- आजकाल हृदयविकाराच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. त्यातही तरुण वयात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. अशा प्रकारे हृदयविकाराने अचानक मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांची अवस्था बिकट होते. पण जर बस किंवा इतर कोणतेही वाहन चालवताना चालकाला हृदयविकाराचा झटका आला तर चालकासोबतच प्रवाशांच्या जीवितालाही धोका निर्माण होतो. शिवाय बसचा ताबा सुटून रस्त्याने जाणाऱ्यांचेही जीव जाऊ शकतात. पण नशीब बलवत्तर असेल तर कोणीतरी देवदूतासारखा येऊन प्राण वाचवतो.

असाच एक व्हिडिओ तमिळनाडूतील दिंडीगुल जिल्ह्यातून समोर आला आहे. खाजगी बस पळणी बसस्थानकावरून पुदुकोट्टाईला जात असताना चालकाला हृदयविकाराचा झटका आला. तो बाजूला कोसळला. त्या क्षणी सर्वांनाच काय करावे हे सुचत नव्हते. पण प्रवाशांचे नशीब चांगले होते. शेजारीच कंडक्टर होता. त्याने हे पाहून सतर्कतेने बस थांबवली. कंडक्टरलाही गाडी चालवता येत असल्याने बस थांबवणे सोपे झाले. यामुळे बसमधील ३५ प्रवाशांचे प्राण वाचले.

मात्र, चालक प्रभू याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. हे दृश्य बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. प्रवाशांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. बसचा ताबा सुटताच बसच्या कंडक्टरने ब्रेक लावून बस थांबवली आणि प्रवाशांचे प्राण वाचवल्याबद्दल कौतुक होत आहे. 

काही दिवसांपूर्वी कर्नाटक ट्रान्सपोर्टच्या बस चालकाला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे बसचा ताबा सुटून एका पादचाऱ्या महिलेला धडक बसली. चालक आणि महिला यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना म्हैसूर जिल्ह्यातील एच.डी. कोटे तालुक्यात घडली होती. एच.डी. कोटे तालुक्यातील दम्मनकट्टे येथे म्हैसूर विभागाची बस जाताना चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. चालक स्टेअरिंगवरच ताबा सुटून कोसळला तेव्हा बसचा ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेने चालत जाणाऱ्या महिलेवर बस चढली. त्यात तिचा मृत्यू झाला. मात्र सर्व प्रवासी सुखरूप वाचले.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

देशभरात हवाई दरांवर मर्यादा घालणे शक्य नाही -विमान वाहतूक मंत्र्यांचे स्पष्टीकरण
Goa Nightclub : 'फक्त एकच एन्ट्री-एक्झिट, कर्मचाऱ्यांकडून मारहाण', लुथ्रा ब्रदर्सच्या गोव्यातील क्लबबद्दल महिला पर्यटकाची तक्रार