हैदराबादमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, दोन संशयीत दहशतवाद्यांना अटक

Published : May 19, 2025, 09:36 AM IST
हैदराबादमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, दोन संशयीत दहशतवाद्यांना अटक

सार

सिराज नावाच्या व्यक्तीने विजयनगरमध्ये स्फोटके तयार केली. त्यानंतर समीरसोबत मिळून ती हैदराबादला नेली आणि हल्ला करण्याचा कट रचला. मात्र, त्याआधीच गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या.

हैदराबाद- हैदराबादमध्ये बॉम्बहल्ल्याचा कट उधळल्याची माहिती तेलंगणा पोलिसांनी दिली आहे. विजयनगरमचा सिराज आणि हैदराबादचा समीर हे दोघे शहरात बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हे दोघे मिळून प्रथम 'डमी ब्लास्ट' करून नंतर मोठा हल्ला करण्याचा विचार करत होते.

सौदी अरेबियातील आयसिस मॉड्यूलकडून नियोजन

या दोघांना मार्गदर्शन करणारा गट आयसिसशी संबंधित आहे. त्यातही सौदी अरेबियातील मॉड्यूलकडूनच त्यांना सूचना मिळाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. कुठे बॉम्ब ठेवायचा? कसा कट रचायचा? याबाबत त्यांना सौदीहून सूचना मिळाल्या. त्यामुळे शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणांची त्यांनी पाहणी केली.

सिराजने विजयनगरमध्येच स्फोटके तयार केली होती. त्यानंतर समीरसोबत मिळून ती हैदराबादला नेली आणि हल्ला करण्याचा कट रचला.

मात्र, त्याआधीच गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या. तेलंगणा काउंटर इंटेलिजन्स आणि आंध्र प्रदेश इंटेलिजन्सने मिळून त्यांना ताब्यात घेतले.

जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळ पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये शोध मोहिमा सुरू आहेत. अशा वेळी हैदराबादमध्ये स्फोटाचा कट उधळण्यात आला.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest
MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department