IAS Amneet P Kumar कोण आहेत IPS वाय पूरण कुमार यांच्या IAS पत्नी अमनित: हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) आणि 2001 च्या बॅचचे IPS अधिकारी वाय पूरण कुमार यांनी 7 ऑक्टोबर रोजी चंदीगडमध्ये आत्महत्या केली.
Haryana IPS Y Purna Kumar and IAS Amneet P Kumar : हरियाणा पोलीस आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे. राज्याचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी (अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP)) वाय पूरण कुमार यांनी आत्महत्या केली. त्यांनी मंगळवारी, ७ ऑक्टोबर रोजी चंदीगडच्या सेक्टर ११ मधील त्यांच्या सरकारी निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडली. या धक्कादायक बातमीने राज्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दुःखद बाब म्हणजे, त्यांच्या पत्नी परदेश दौऱ्यावर असताना त्यांनी हे पाऊल उचलले.
CM नायब सिंह सैनी यांच्यासोबत जपान दौऱ्यावर आहेत IAS अमनित
आयपीएस वाय पूरण कुमार यांच्या पत्नी अमनित पी कुमार या देखील आयएएस अधिकारी आहेत. त्या सध्या जपान दौऱ्यावर आहेत. त्या हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासोबत गेलेल्या प्रतिनिधी मंडळाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. या दुःखद घटनेची माहिती मिळताच, महिला आयएएस अधिकारी आपला जपान दौरा अर्धवट सोडून आज संध्याकाळी भारताकडे रवाना होतील, असे मानले जात आहे. त्या बुधवार (८ ऑक्टोबर) सकाळपर्यंत चंदीगडला पोहोचू शकतात.
कोण आहेत आयएएस अधिकारी अमनित पी कुमार
अमनित पी कुमार 2001 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1977 रोजी पंजाबमध्ये झाला आहे.
त्यांनी पंजाब विद्यापीठातून इतिहासात एमए आणि आयआयटी मद्रासमधून हेल्थ इकॉनॉमिक्समध्ये पीएचडी पदवी मिळवली आहे.
त्या गेल्या दोन वर्षांपासून हरियाणा सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्त आणि सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
त्या परराष्ट्र सहकार्य विभागात सचिव आणि आयुक्त पदावरही कार्यरत आहेत. अमनित पी कुमार यांची गणना हरियाणाच्या अव्वल आयएएस अधिकाऱ्यांमध्ये केली जाते.
अमनित पी कुमार यांनी आपल्या कारकिर्दीत आरोग्य, वित्त आणि औद्योगिक विकास यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये काम केले आहे.
हरियाणात नेहमीच असते त्यांची चर्चा
आयएएस अमनित पी कुमार यांची त्यांच्या उत्कृष्ट कामांसाठी नेहमीच चर्चा होत असते. त्यांना दिलेले कोणतेही काम त्या वेळेत पूर्ण करतात.
त्यांना आरोग्य आणि अर्थशास्त्रामध्ये विशेष प्राविण्य आहे. याचा योग्य वापर त्यांनी सरकारी धोरणे अधिक चांगली बनवण्यासाठी केला आहे.
आयएएस अमनित यांनी आपल्या कार्यकाळात 'प्लेस्कूल धोरण' सुरू केले आहे. हे मुलांच्या हक्कांसाठी आणि उत्तम शिक्षणाच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जाते.
अमनित कुमार यांनी हरियाणात 'बेटी बचाओ बेटी पढाओ' अभियान यशस्वी करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.