चूक कोणाची?
उत्तर प्रदेशातील या घटनेने तंत्रज्ञानातील त्रुटीच नव्हे तर अधिकाऱ्यांची निष्काळजीपणाही उघड केला आहे. पूल कोसळून बरेच दिवस झाले तरी जीपीएस नेवहिगेशनमध्ये अपडेट न झाल्याने तोच मार्ग दाखवला जात होता, जो अपघाताचे मुख्य कारण ठरला. पण हे एकच कारण नाही.
पूल कोसळल्याची माहिती अधिकाऱ्यांना होती. त्यामुळे त्यावर कोणीही जाऊ नये याची जबाबदारी अधिकाऱ्यांची होती. जर त्यांनी इशारा फलक किंवा बॅरिकेड लावले असते तर जीपीएस नेवहिगेशनचे अनुसरण करणारेही सावध झाले असते. पण अशी कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही. त्यामुळेच हा अपघात झाला आणि तीन निष्पाप जीवांचा बळी गेला.
अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पूल कोसळून बरेच दिवस झाले असून ये-जा करण्यास खूप त्रास होत असल्याची तक्रार अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे अनेक वेळा केली, पण त्यांनी दखल घेतली नाही असे ते म्हणत आहेत. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाला असा आरोप ते करत आहेत.