
मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटी रुपयांच्या आरोपावर बोलताना आपण कोणाकडून पैसे घेतलेही नाहीत आणि कोणाला दिलेही नाहीत, असे शिंदेंनी स्पष्ट केले. जरांगेंनी पुरावे संबंधित यंत्रणांकडे द्यावेत आणि चौकशी व्हावी, अशी मागणी केली. मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रे आणि 5300 जणांना नोकऱ्या दिल्याचा उल्लेख करत जरांगेंनी समाजकार्याचे राजकारण करू नये, असा सल्ला दिला. संजय राऊत यांच्या अमित शहा आणि नरेंद्र मोदींवरील आरोपांवरही शिंदेंनी टीका केली. सत्ता परिवर्तन जनता ठरवते, विरोधक नव्हे, असे सांगत विरोधक सत्तेसाठी तडफडत असल्याचा टोला त्यांनी लगावला. सर्वोच्च न्यायालयावरील मोर्चावरूनही त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले.