Devendra Fadnavis | 250 हून अधिक अग्निवीरांना फडणवीसांकडून पोलीस नोकरी

Devendra Fadnavis | 250 हून अधिक अग्निवीरांना फडणवीसांकडून पोलीस नोकरी

Published : Oct 23, 2026, 09:02 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील अग्निवीरांना पोलीस दलात सामावून घेण्याच्या निर्णयाची माहिती दिली. नौदलातून कार्यकाळ पूर्ण करून परतलेल्या 250 हून अधिक अग्निवीरांना महाराष्ट्राच्या सागरी पोलीस दलात थेट नियुक्ती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अग्निवीरांनी सैन्यात कठोर प्रशिक्षण घेतलेले असल्यामुळे त्यांना स्वतंत्र भरती चाचणीतून सूट देण्यात आली आहे. यासाठी काही नियमांमध्ये बदल करून थेट नियुक्तीचे आदेश देण्यात आल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. या प्रशिक्षित जवानांमुळे महाराष्ट्राची सागरी सुरक्षा अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात लष्कर आणि हवाई दलातून परतणाऱ्या इच्छुक अग्निवीरांनाही महाराष्ट्र पोलीस दलात काम करण्याची संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

04:13Chhath Puja | Anand Dubey | छठपूजेला विरोधावर आनंद दुबेंचा राज ठाकरेंना टोला
09:35NCP Merger | Sanjay Raut | अजित पवार महायुती सोडणार होते; संजय राऊतांचा दावा
05:00Sanjay Shirsat | संजय शिरसाटांच्या घरावर हल्ला; पोलिसांवर आरोप
02:54Beed Drought | बीड जिल्ह्यात दुष्काळाचे सावट जाणवू लागले, आतापासून पाण्यासाठी वणवण
04:33Navi Mumbai | Cleanest City | स्वच्छतेत नवी मुंबई अव्वल; सुजाता पाटलांची माहिती
08:45Sanjay Nirupam | छठगीतांच्या विरोधावर संजय निरुपमांचं उत्तर
09:03Manoj Jarange Patil | मराठा सेवक नोंदणीसाठी जरांगेंचा WhatsApp नंबर
04:39Sonia Gandhi | Youth Congress | सोनिया गांधींच्या पुस्तकावर युवक काँग्रेसची चर्चा
03:40Ashish Shelar | राष्ट्रवादी मर्जर चर्चेवर सांगितली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका
09:20Devendra Fadnavis | रामटेकमध्ये कृषी महाविद्यालय; फडणवीसांचे भाषण