
राज्यात दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करणे देखील कठीण झाले आहे. म्हणून दिवाळी आधी 5 हजार तात्काळ दुष्काळी मदत देणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते, यावरुन 28 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 5 हजार दिवाळीची तात्काळ दुष्काळी मदत टाकणे सुरु झाले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले आहे.