Ambadas Danve | अंबादास दानवे: शेतकऱ्यांना हेक्टरी ₹50 हजार द्या | Maharashtra Drought

Ambadas Danve | अंबादास दानवे: शेतकऱ्यांना हेक्टरी ₹50 हजार द्या | Maharashtra Drought

Published : Sep 23, 2026, 09:06 PM IST

अंबादास दानवे यांनी वाशिममधील दुष्काळी परिस्थिती आणि नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली. महाराष्ट्रात अनेक भागांत सुमारे 55 दिवस पाऊस नसल्याचे सांगत विदर्भ आणि मराठवाड्यात गंभीर परिस्थिती असल्याचा दावा त्यांनी केला. कर्नाटकात 130 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून मदत सुरू झाल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारनेही निर्णय घेण्यास विलंब करू नये, असे ते म्हणाले. वाशिममध्ये पिकांचे 100 टक्के नुकसान झाल्याचा दावा करत शेतकऱ्यांना किमान हेक्टरी ₹50 हजार मदत द्यावी, अशी मागणी दानवे यांनी केली. दुष्काळाचा जीआर काढण्याबरोबरच प्रतिहेक्टर किती मदत देणार हे सरकारने तातडीने जाहीर करावे, असे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हटले. कृषिमंत्र्यांसह इतर मंत्र्यांकडे निर्णय घेण्याचे अधिकार नसून शेतकऱ्यांसाठी मदतीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनीच घ्यावा, असा आरोप दानवे यांनी केला. NDRF संदर्भातील निर्णयासाठी 5 ऑक्टोबरपर्यंत वाट न पाहता मदत जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली. कर्जमाफीनंतर काही बँका CIBILचे कारण देत शेतकऱ्यांना कर्ज नाकारत असल्याच्या तक्रारीबाबत सरकारशी चर्चा करणार असल्याचेही दानवे यांनी सांगितले.

03:09Chhath Puja 2026 | मुंबईच्या जुहू चौपाटीवर छठपूजेसाठी भाविकांची गर्दी
01:27Devendra Fadnavis | गडचिरोलीत ४ हजारांना रोजगार! फडणवीसांची माहिती
03:01बीडमध्ये नवजात बाळाला डॉक्टरांच्या मायेचा आधार!
04:41NCP Merger | Chhagan Bhujbal | राष्ट्रवादी विलीनीकरणावर छगन भुजबळ काय म्हणाले?
05:20Laman diva | दिवाळीत जगभरात चर्चा झाली या महाराष्ट्रातील 33 फूट उंच लामण दिव्याची
03:11Birsa Munda Jayanti | Eknath Shinde | बिरसा मुंडा जयंतीनिमित्त एकनाथ शिंदेंकडून मोदींचे कौतुक
04:13Chhath Puja | Anand Dubey | छठपूजेला विरोधावर आनंद दुबेंचा राज ठाकरेंना टोला
09:35NCP Merger | Sanjay Raut | अजित पवार महायुती सोडणार होते; संजय राऊतांचा दावा
05:00Sanjay Shirsat | संजय शिरसाटांच्या घरावर हल्ला; पोलिसांवर आरोप
02:54Beed Drought | बीड जिल्ह्यात दुष्काळाचे सावट जाणवू लागले, आतापासून पाण्यासाठी वणवण