Cricketers Divorces: घटस्फोट घेतलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत आता आणखी एकाची भर

Published : Feb 21, 2026, 12:34 PM IST

Cricketers Divorces: भारतीय क्रिकेट विश्वात सध्या घटस्फोटांचं सत्र सुरू आहे. हार्दिक पांड्या, शिखर धवननंतर आता राहुल चहरनेही पत्नीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया अशाच काही क्रिकेटर्सबद्दल ज्यांची लग्नं फार काळ टिकली नाहीत.

PREV
15
राहुल चहर-इशानी जोहर

राहुलने पत्नी इशानी जोहरपासून घटस्फोट घेत असल्याची माहिती इंस्टाग्राम पोस्टमधून दिली. त्याने 20 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर ही घोषणा केली. या जोडप्याने 2022 मध्ये लग्न केलं होतं आणि त्यांच्या चौथ्या अॅनिव्हर्सरीच्या आसपासच हा निर्णय घेतला.

25
शिखर धवन-आयेशा मुखर्जी

शिखर धवनने आयेशा मुखर्जीसोबत 8 वर्षांच्या संसारानंतर 2023 मध्ये घटस्फोट घेतला. पत्नीकडून मानसिक छळ होत असल्याच्या कारणावरून कोर्टाने त्याला घटस्फोट मंजूर केला. तो आता दुसऱ्या लग्नाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

35
युजवेंद्र चहल-धनश्री वर्मा

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाची बातमी देशभरात खूप गाजली होती.

45
हार्दिक पंड्या-नताशा स्टँकोविच

हार्दिकने अभिनेत्री नताशा स्टँकोविचसोबतच्या चार वर्षांच्या लग्नानंतर 2024 मध्ये विभक्त झाल्याची अधिकृत घोषणा केली. त्यांना अगस्त्य नावाचा एक मुलगा आहे. हार्दिक सध्या एका मॉडेलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

55
मोहम्मद शमी-हसीन जहाँ
मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँ यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने ते अनेक वर्षांपासून कायदेशीर लढाई लढत आहेत. दोघेही सध्या वेगवेगळे राहतात.
Read more Photos on

Recommended Stories