Couple Locks Train Toilet For Two Hours : एका तरुण आणि तरुणीने ट्रेनच्या टॉयलेटमध्ये जाऊन जवळपास दोन तास दार बंद करून ठेवल्याने, इतर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. जाणून घ्या नेमके काय घडले. कोण होते दोघे.
जवळपास दोन तास तरुण-तरुणी ट्रेनच्या टॉयलेटमध्ये राहिल्याने प्रवाशांना खूप त्रास झाला. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे व्यवस्था आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत.
25
तरुणीचं धक्कादायक वागणं आणि विधान
तरुण आणि तरुणी ट्रेनच्या टॉयलेटचा वापर एका खासगी खोलीसारखा करत होते. त्यामुळे इतर प्रवाशांना बराच वेळ वाट पाहावी लागली. यावर प्रश्न विचारल्यावर तरुणीचं वागणं आणि विधान धक्कादायक होतं.
35
दार उघडल्यावर तरुणीचा बिनधास्त अंदाज
तरुण-तरुणी ट्रेनच्या टॉयलेटमध्ये जाऊन जवळपास दोन तास दार बंद करून बसल्याने इतर प्रवाशांना खूप त्रास झाला. दार उघडायला उशीर झाल्यावर प्रवाशांनी गोंधळ घातला. त्यामुळे ही घटना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. अखेर दार उघडल्यावर तरुणीच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता.
या घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये मुलगी म्हणताना ऐकू येते, 'मला जे आवडेल ते मी करेन, ती माझी इच्छा आहे'. व्हिडिओ व्हायरल झाल्याचं लोकांनी सांगितल्यावर 'व्हायरल झाला तर मला काय?' असा प्रश्नही मुलगी विचारते. व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा..
55
सोशल मीडियावर जोरदार टीका
घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हे सार्वजनिक शिष्टाचाराचे आणि प्रवाशांच्या हक्कांचे उल्लंघन आहे, दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युजर्स करत आहेत. 'त्यांनी ट्रेनमध्ये असं करायला नको होतं. हे पूर्णपणे चुकीचं आहे', 'वातावरण खराब करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे', 'हे ट्रेनचं टॉयलेट आहे, हॉटेलची खोली नाही. आपण इतरांच्या समस्यांचा तरी विचार करायला हवा' अशा कमेंट्स युजर्स करत आहेत.