
नवी दिल्ली : विद्यार्थी आंदोलन आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद पुन्हा एकदा वाढण्याचं चित्र दिसत आहेत. कॉकरोच जनता पार्टीने (CJP) सरकारवर एक गंभीर आरोप केला आहे. विद्यार्थ्यांवर कोणतीही पोलीस कारवाई केली जाणार नाही, असं आश्वासन सरकारने दिलं होतं, पण ते पाळलं नाही, असा दावा CJP ने केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बिहार, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. तर दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पाळत ठेवली जात आहे आणि त्यांना त्रास दिला जात आहे.
केंद्रीय मंत्र्यांना टॅग करत केली मागणी
CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांना टॅग केलं आहे. त्यांनी टॅग करत पोस्टमध्ये लिहिलंय, आंदोलन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलंय की, विद्यार्थ्यांवर होणारी ही कारवाई ठरलेल्या गोष्टीच्या विरोधात आहे. सरकारने विद्यार्थ्यांवरील गुन्हे हटवण्यास सहमती दिली होती. मात्र सरकार आता दिलेलं आश्वासन पाळत नाही, असं दिसतं आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.
Dear @JPNadda @DrJitendraSingh ji,
We are observing a complete breach of the agreement regarding no police action against the protestors. Hundreds of students have been arrested in Bihar and Bengal, and hundreds are being surveilled/harrassed in Delhi and other states. Multiple…— Ashutosh Ranka (@AshutoshRanka) July 27, 2026
मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार
आशुतोष रांका यांनी इशारा दिला आहे की, जर सरकारने विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेतले नाहीत आणि ही कारवाई थांबवली नाही, तर CJP कॉकरोच जनता पार्टी पुन्हा एकदा आंदोलन सुरू करेल. विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांसाठी संघटना यापुढेही आवाज उठवत राहील, असंही त्यांनी म्हटलं आहे.
सरकारच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा
सध्या केंद्र सरकारने CJP च्या या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण सोशल मीडियावर हा विषय चर्चेत आला आहे. सरकारने आश्वासन न पाळण्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे.