धक्कादायक! मंदिराच्या वॉशरूममध्ये दोन कॉलेज तरुणींचे मृतदेह, ChatGPT ने उलगडलं मृत्यूचं रहस्य

Published : Mar 09, 2026, 07:34 AM IST
ChatGPT Search History Reveals Clues in Surat

सार

ChatGPT Search History Reveals Clues in Surat : सुरतजवळच्या एका मंदिराच्या वॉशरूममध्ये दोन कॉलेज तरुणींचे मृतदेह सापडले आहेत. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलची तपासणी केली असता, चॅटजीपीटीवरील सर्चमुळे मृत्यूचं गूढ उलगडण्यास मदत झाली.

ChatGPT Search History Reveals Clues in Surat : गुजरातच्या सुरतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इथल्या स्वामीनारायण मंदिराच्या वॉशरूममध्ये दोन कॉलेज तरुणींचे मृतदेह सापडले आहेत. या दोघी जिवलग मैत्रिणी होत्या. त्या बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे त्यांचा शोध घेतला. विशेष म्हणजे, या तरुणींच्या मोबाईलमधील चॅटजीपीटी (ChatGPT) या AI टूलने त्यांच्या मृत्यूचं गूढ उलगडण्यास मदत केली आहे. ही घटना सुरतजवळच्या आत्मिय संस्कार धाम स्वामीनारायण मंदिराच्या परिसरात घडली.

१८ आणि २० वर्षांच्या होत्या दोन्ही तरुणी

रोशनी शिरसाठ (वय १८) आणि जोशना चौधरी (वय २०) अशी मृत तरुणींची नावं आहेत. त्या सुरतच्या दिंडोली परिसरात राहायच्या आणि दोघींमध्ये घट्ट मैत्री होती. नेहमीप्रमाणे त्या स्कूटरवरून कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या, पण रात्री उशिरापर्यंत घरी परतल्याच नाहीत. त्यामुळे त्यांच्या काळजीत पडलेल्या घरच्यांनी त्या हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली. तक्रार मिळताच पोलिसांनी लगेच त्यांच्या मोबाईल नंबरवरून तपास सुरू केला.

टॉवर लोकेशनमुळे लागला शोध

पोलिसांनी तात्काळ मोबाईलच्या टॉवर लोकेशनवरून त्या कुठे आहेत, याचा शोध घेतला. लोकेशन सुरतजवळच्या आत्मिय संस्कार धाम स्वामीनारायण मंदिराच्या परिसरातील दाखवत होतं. त्यामुळे पोलिसांचं पथक थेट मंदिरात पोहोचलं. तिथे त्यांना मंदिराच्या आवारातच या तरुणींची स्कूटर उभी असलेली दिसली.

मंदिराच्या CCTV मध्ये काय दिसलं?

पोलिसांनी मंदिरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये या दोन्ही तरुणी मंदिराच्या वॉशरूममध्ये जाताना दिसल्या, पण त्या बाहेर आल्याच नाहीत. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी वॉशरूमजवळ जाऊन दरवाजा ठोठावला, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा दोघींचे मृतदेह जमिनीवर पडलेले होते.

चॅटजीपीटीने उलगडलं मृत्यूचं रहस्य

पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आणि त्यांचे मोबाईल फोन ताब्यात घेतले. मोबाईल तपासल्यावर पोलिसांना धक्काच बसला. या तरुणींनी 'त्रास न होता आयुष्य कसं संपवायचं?' (how to end life without pain) असं चॅटजीपीटीवर सर्च केलं होतं. इतकंच नाही, तर भूल देण्याच्या औषधाचा (anesthesia) ओव्हरडोस घेतल्याने झालेल्या मृत्यूच्या बातम्यांचे स्क्रीनशॉटही त्यांच्या मोबाईलमध्ये सापडले. मृतदेहांजवळ भूल देण्याच्या औषधाच्या बाटल्या आणि वापरलेल्या सिरींजही पोलिसांना मिळाल्या. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे. चॅटजीपीटीवरील सर्चमुळे पोलिसांना हा महत्त्वाचा सुगावा लागला. आता त्यांनी आत्महत्या का केली, याचं कारण शोधण्यासाठी पोलीस त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि मेसेज तपासत आहेत.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

navnath ban on vivekananda patil | विवेकानंद तू आता ट्रॅकवर आला, का म्हणाले बन | MPSC Protest Pune
Indian Railways Rules : रेल्वेचे आधार, तिकीट आणि लगेजचे नियम; प्रवाशांनो, ही माहिती नक्की वाचा!