अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी 3.0 बजेट 23 जुलैला सादर करणार, घोषणांचा पाऊस पडणार?

Published : Jul 06, 2024, 04:22 PM ISTUpdated : Jul 10, 2024, 12:05 PM IST
finance minister nirmala sitharaman budget senior citizens

सार

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैला सुरू होऊन ते 12 ऑगस्टला संपणार आहे 

2024-25 चा संपूर्ण अर्थसंकल्प 23 जुलै रोजी सादर केला जाईल, संसदेचे अधिवेशन एक दिवस आधी सुरू होईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी केली. संसदीय कामकाज मंत्री म्हणाले की अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होईल आणि 12 ऑगस्टला संपेल.

"भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी, भारत सरकारच्या शिफारशीनुसार, 22 जुलै, 2024 ते 12 ऑगस्ट, 2024 या कालावधीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, 2024 बोलावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत 23 जुलै 2024 रोजी सादर केला जाईल," असे मंत्री किरेन रिजिजू यांनी X वर पोस्ट केले.

मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिल्या बजेटमध्ये काय काय असणार याबाबत अंदाज लावले जात आहेत. नोकरदार वर्गाला कराच्या आघाडीवर काही प्रमाणात दिलासा आणि सवलती मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, अंतरिम अर्थसंकल्पामुळे त्यांची काहीशी निराशा झाली होती. आता या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला करात सूट मिळण्याची शक्यता आहे.

एलपीजी सबसिडीची मुदत वाढविणे, विविध वस्तूंवरील कर कमी करणे, शेतकऱ्यांच्या निधीत ६००० वरून वर्षाला ८००० रुपयांची वाढ करणे आदी घोषणा केल्या जातील असा अंदाज आहे.

आणखी वाचा : 

अग्निवीरच्या वादात राहुलने पुन्हा हल्ला केला, विम्याची रक्कम आणि भरपाई वेगवेगळी असल्याचा दिली माहिती

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Airport Privatisation: हुबळीसह देशातील ११ विमानतळ ५० वर्षांसाठी खाजगी हातात, डिसेंबरमध्ये निघणार टेंडर!
Vande Bharat Express: 'वंदे भारत'चा प्रवास खूप सुरक्षित वाटला; लिथुआनियाच्या तरुणीचा अनुभव व्हायरल