पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान अहमदाबाद विमानतळावर उतरले आहे. आज मोदी घटनास्थळाला भेट देणार आहेत. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपुस करणार आहेत. या अपघातात गुजराचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही मृत्यू झाला आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे समजते. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ गुरुवारी घडलेल्या एअर इंडिया विमान अपघातात एक हृदयद्रावक घटना घडली. बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर, एअर इंडिया फ्लाइट १७१ या प्रवासी विमानाचा थेट धडक होऊन अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत एकूण २४१ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात १२ केबिन क्रू सदस्यांचाही समावेश आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली, जेव्हा लंडन गॅटविककडे जाणारे हे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करत असतानाच काही मिनिटांत रेसिडेंट डॉक्टर्सच्या हॉस्टेल इमारतीवर आदळले. ही धडक इतकी जबरदस्त होती की संपूर्ण विमान नष्ट झाले आणि इमारतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

10:50 AM (IST) Jun 13
10:42 AM (IST) Jun 13
10:10 AM (IST) Jun 13
10:07 AM (IST) Jun 13
भारताच्या नागरी उड्डाण इतिहासातील सर्वात भीषण आणि प्राणघातक एकल विमान अपघात गुरुवारी अहमदाबादमध्ये घडला. एअर इंडिया 787-8 ड्रीमलाइनर विमान — अवघ्या ११ वर्षं जुनं — लंडन गॅटविककडे रवाना होत असताना केवळ ३० सेकंदांत २६५ जणांचा जीव गमावणारी ही दुर्घटना घडली. पीटीआयच्या वृत्तानुसार मृतांचा आकडा किमान २६५ वर पोहोचला असून, यात प्रवासी व चालक दलातील सदस्यांचे समावेश आहे. हे दुर्घटनाग्रस्त विमान एकूण २४२ प्रवासी आणि क्रू सदस्यांसह अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेत होते.
09:33 AM (IST) Jun 13
एअर इंडिया फ्लाइट AI-171 च्या भीषण अपघातानंतर मृतांच्या ओळखीसाठी अहमदाबादच्या BJ मेडिकल कॉलेजमधील कसौटी भवनात DNA नमुना घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अपघातात मृत्यू पावलेल्यांचे मृतदेह अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आल्यामुळे त्यांची ओळख पटवण्यासाठी आता DNA चाचणी हाच एकमेव आधार ठरतो आहे.या पार्श्वभूमीवर, शेकडो नातेवाईक कसौटी भवनात आपल्या DNA नमुने जमा करण्यासाठी येत आहेत, आपल्या आप्तेष्टांच्या अवशेषांची ओळख पटावी, या आशेने त्यांचे मन धास्तावलेले आहे. वातावरणात भीती, काळजी आणि शोकाचा ठसा स्पष्ट जाणवत आहे.
09:22 AM (IST) Jun 13
09:20 AM (IST) Jun 13
09:18 AM (IST) Jun 13
अहमदाबाद येथे घडलेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातामुळे अनेक निष्पाप जिवांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण देशभर शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी या दुर्घटनेत प्रभावित झालेल्या सर्व कुटुंबीयांप्रती आपल्या शोकभावना व्यक्त करताना म्हटले, “नीता आणि मी, तसेच संपूर्ण रिलायन्स परिवार, अहमदाबाद येथील या दुर्दैवी विमान अपघातामुळे झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत व्यथित आणि व्याकुळ आहोत. या अत्यंत वेदनादायक घटनेत ज्या कुटुंबांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहेत, त्यांच्याप्रती आम्ही मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.”
अंबानी दाम्पत्याने या संदेशात आपली सहवेदना आणि सहानुभूती व्यक्त करत सांगितले की, अशा दु:खद प्रसंगी संपूर्ण रिलायन्स कुटुंब आपल्या भावना पीडित कुटुंबांबरोबर वाटून घेत आहे.
09:13 AM (IST) Jun 13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी दुर्घटना स्थळाची पाहणी केली. काल गुरुवारी या ठिकाणी एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान कोसळले होते. बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीवर विमान कोसळल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी अजूनही बचावकार्य राबविले जात आहे.