एशियानेट न्यूजवर 4 मे 2025 च्या देश-विदेश, महाराष्ट्र-मुंबईतील वाचा ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

08:43 PM (IST) May 04
टॉक्सिक नातेवाईक: जया किशोरी सांगत आहेत आयुष्यात टॉक्सिक लोकांशी कसे वागावे. सरळ संवाद, राग नियंत्रण आणि अंतर राखणे गरजेचे आहे. स्वतःला शांत ठेवा आणि गरज पडल्यास कठोर निर्णय घ्या.
08:00 PM (IST) May 04
KKR विरुद्ध RR: आयपीएल २०२५ च्या ५३ व्या सामन्यात रियान परागने धमाकेदार फलंदाजी केली. KKR विरुद्ध त्याने ६ चेंडूत ६ षटकार ठोकले. यासोबतच तो दिग्गज फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.
07:51 PM (IST) May 04
पुणे-नाशिक उच्चगती रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्याचे (रिअलाइनमेंट) काम सध्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच महाराष्ट्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
07:29 PM (IST) May 04
येमेनच्या हूथी बंडखोरांनी डागलेला क्षेपणास्त्र इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळाजवळ पडले, ज्यामुळे एअर इंडियाला आपले दिल्ली-तेल अवीव विमान अबू धाबीला वळवावे लागले आणि सुरक्षेच्या कारणास्तव ६ मेपर्यंत सेवा स्थगित कराव्या लागल्या.
06:16 PM (IST) May 04
रविवारी रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा येथे लष्करी ट्रक सुमारे २००-३०० मीटर खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला.
06:09 PM (IST) May 04
सनी देओल सध्या त्यांच्या आगामी चित्रपट 'बॉर्डर २'च्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. दरम्यान, चित्रपटातील सनीचा लुक कसा असेल याचे फोटो सेटवरून समोर आले आहेत. चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
05:56 PM (IST) May 04
जागतिक हास्य दिन २०२५: म्हणतात की एखाद्याला हसवणे हे सर्वात कठीण काम आहे. पण याच कलेच्या जोरावर भारतात अनेक कलाकारांनी प्रचंड संपत्ती कमावली आहे. जागतिक हास्य दिन २०२५ निमित्त जाणून घ्या देशातील ५ सर्वात श्रीमंत विनोदवीरांबद्दल...
05:51 PM (IST) May 04
क्रेडिट कार्ड मोफत प्रवास: क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही प्रवासाचा खर्च कमी करू शकता हे तुम्हाला माहित आहे का? फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग स्वस्त करता येतात? जर नाही, तर प्रवासात पैसे वाचवण्यासाठी ५ खास टिप्स जाणून घ्या.
05:18 PM (IST) May 04
भारताची नौदल, हवाई दल, भूदल आणि सामरिक क्षेत्रातील लष्करी क्षमता पाकिस्तानपेक्षा खूपच पुढे आहे. पाकिस्तानचे मर्यादित संसाधने आणि चीनवर अवलंबून राहणे त्यांच्या आधुनिकीकरणाला मर्यादित करते.
05:00 PM (IST) May 04
सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर '१८ तुकडे करण्याची धमकी' दिल्याचा आरोप केला आहे.
04:49 PM (IST) May 04
04:40 PM (IST) May 04
Homemade skin tonner : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी घरी सहजपणे नैसर्गिक टोनर बनवा. काकडी, गुलाबपाणी आणि एलोव्हेरापासून बनवलेला हा टोनर त्वचेला थंडावा देईल, मुरुमांपासून वाचवेल आणि सनबर्नपासूनही आराम देईल.
04:27 PM (IST) May 04
१९८४ च्या सिख दंग्यांवर राहुल गांधी यांनी अमेरिकेत काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की त्या काळात घडलेल्या चुकांसाठी ते जबाबदार आहेत.
04:23 PM (IST) May 04
04:12 PM (IST) May 04
सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांच्या मुंबईतील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अभिनेता धनुषने 'अडंगाथा असुरन' गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स सादर केला. धनुषच्या स्टेजवरील ऊर्जा आणि आत्मविश्वासाने प्रेक्षकांना भारावून टाकले.
04:10 PM (IST) May 04
महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीच्या दिवशी पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली. या अपघातात 19 जण जखमी झाले असून सात जण देखील गंभीर जखमी झालेत.
03:50 PM (IST) May 04
पहलगाम दहशतवादी हल्ला : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारताच्या प्रतिक्रियेच्या भीतीने पाकिस्तानने मध्यरात्री संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे.
02:34 PM (IST) May 04
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारताने कडक पावले उचलत पाकिस्तानी नेते, क्रिकेटपटू आणि कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे.
02:21 PM (IST) May 04
Maharashtra : जळगावमध्ये तिघांवर मध्यरात्री तलवारीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळीचे वातावरण आहे.
01:44 PM (IST) May 04
१० मे २०२५ पासून शहरातील पेट्रोल पंपांवर युपीआय, डेबिट/क्रेडिट कार्ड अशा सर्व डिजिटल पेमेंट्स स्वीकारणं बंद केलं जाणार असल्याचा इशारा पेट्रोल पंप मालकांनी दिला आहे.
01:22 PM (IST) May 04
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तानने धमकी दिली आहे की भारताने हल्ला केला तर अणुबॉम्बने प्रत्युत्तर देऊ.
01:16 PM (IST) May 04
मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या पक्षाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
01:10 PM (IST) May 04
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रविवारी (४ मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
12:42 PM (IST) May 04
12:27 PM (IST) May 04
Maharashtra : नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात 3 हजार वर्षे जुनी लोहयुगीन संस्कृती शोधून काढली आहे. पाचखेड गावातील उत्खननात सातवाहन, मध्ययुगीन आणि निजाम युगासह विविध सांस्कृतिक कालखंडांसह बहुस्तरीय वस्ती आढळून आली.
12:06 PM (IST) May 04
12:04 PM (IST) May 04
बीएसएफने राजस्थान सीमेवरून एका पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतले आहे, तर भारताचा जवान अजूनही पाकिस्तानात कैद आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाक तणाव सतत वाढत आहे. जाणून घ्या संपूर्ण घटनेची टाइमलाइन आणि राजकीय परिणाम.
11:43 AM (IST) May 04
Maharashtra Accident : वडगाव उड्डाणपूलाजवळील परिसरात 24 तासात तीन जणांचा अपघाती मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. भरधाव वेगाने आलेल्या मोटारीच्या धडकेमध्ये दुचाकीवरुन येणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला.
11:08 AM (IST) May 04
10:51 AM (IST) May 04
देशाच्या आर्थिक राजधानीत एक दिलासादायक वन्यजीवविषयक माहिती समोर आली आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्यालगतची आरे वसाहत हे क्षेत्र आता तब्बल ५४ बिबट्यांचं घर बनलं आहे.
10:49 AM (IST) May 04
Akola : अकोल्यामध्ये घरगुती वाद विकोपाल जात दुहेरी हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये पतीने पत्नी आणि सावत्र मुलीची हत्या केल्याचे सांगितले जात आहे.
09:42 AM (IST) May 04
परभणीतील उड्डाण पुलावर झालेल्या दुचाकी अपघातात दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेला ३१ वर्षीय स्वप्निल लहाने आणि २५ वर्षीय कृष्णा जगताप यांचा समावेश आहे.
09:23 AM (IST) May 04
08:56 AM (IST) May 04
08:48 AM (IST) May 04
सध्या लग्नसोहळ्यांसाठी अपाम खर्च केला जातो. याशिवाय आहेरात मिळालेल्या पैशांवर मजा केली जाते. पण चंद्रपुरातील एका वराने लग्नाच्या पैशांमधून शेतातील रस्ता बांधला आहे.
08:39 AM (IST) May 04
मुंबई : आज रविवारी (४ मे) सोन्याच्या दरात स्थिरता आहे. दरात कोणताही बदल झालेला नाही, पण दर प्रत्येक शहरात वेगवेगळे आहेत. जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एकदा तुमच्या शहराचा दर नक्की तपासा.
08:32 AM (IST) May 04
कानाकोनामध्ये शुक्रवारी सकाळी रस्त्यांवर पाकिस्तानी झेंडे रंगवल्याचे आढळल्यानंतर तणाव निर्माण झाला. स्थानिकांनी पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, नेत्यांनी शांततेचे आवाहन केले आहे.
08:23 AM (IST) May 04
केरळमधील तिरुवनंतपुरम येथे रिक्षा, बाईक आणि कारमध्ये झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर चार जखमी झाले आहेत.