Tusshar Kapoor Threat : टायगर श्रॉफनंतर आता तुषार कपूरला 5 कोटींच्या खंडणीची धमकी

Published : Nov 03, 2026, 08:00 PM IST
Tusshar Kapoor Threat : टायगर श्रॉफनंतर आता तुषार कपूरला 5 कोटींच्या खंडणीची धमकी

सार

तुषार कपूरला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने ५ कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी आली आहे. मात्र, कॉलरचा आवाज जुळत नसल्याने हा कुणीतरी बनावट व्यक्ती असल्याचा संशय मुंबई गुन्हे शाखेला आहे.

मुंबई : टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरला टार्गेट करण्यात आलं आहे. एका अज्ञात व्यक्तीने तुषारला फोन करून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. आपण लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडले गेलो असल्याचा दावा या कॉलरने केला. पण, मुंबई गुन्हे शाखेने जेव्हा या ऑडिओची तपासणी केली, तेव्हा कॉलरच्या आवाजात तफावत आढळली. त्यामुळे कुणीतरी तोतया व्यक्ती बिश्नोई गँगच्या नावाने धमकावत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

तुषार कपूरला कोणी दिली धमकी?

फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख हॅरी बॉक्सर अशी सांगितली. आपण लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचं सांगत त्याने तुषार कपूरकडे ५ कोटींची मागणी केली. या घटनेची माहिती तात्काळ मुंबई पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण खंडणी विरोधी पथक (Anti Extortion Cell) आणि गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलं आहे.

मुंबई पोलिसांना आवाजात आढळली तफावत

गुन्हे शाखेच्या तांत्रिक पथकाने या खंडणीच्या फोन कॉलचं रेकॉर्डिंग ऐकलं आणि आवाजाची पडताळणी केली. या तपासात कॉलरचा आवाज मूळ हॅरी बॉक्सरच्या आवाजाशी अजिबात जुळत नसल्याचं समोर आलं. त्यामुळे कुणीतरी भामटा बिश्नोई गँगच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असल्याचा पोलिसांचा संशय बळावला आहे. सध्या पोलीस या खंडणीखोराचा शोध घेत आहेत. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणताही एफआयआर (FIR) दाखल करण्यात आलेला नाही.

लॉरेन्स बिश्नोई गँग पुन्हा चर्चेत का?

काही आठवड्यांपूर्वीच मुंबईतील जुहू भागात अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगशी संबंधित लोकांनी घेतल्याचा दावा करण्यात आला होता. या लागोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे आता बॉलिवूड स्टार्सच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Kanika Kapoor : कनिका कपूर आणि गौतम हाथीरमानी यांचा घटस्फोट, ४ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय
Hanuman Ansh Movie Controversy : 450 कोटींच्या कमाईनंतर 'हनुमान अंश'च्या टीममध्ये फूट, हक्कांसाठी निर्मात्यांमध्ये वाद