भारतातील अनेक गायकांनी आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. पण २०२६ मध्ये भारतातील ५ सर्वात श्रीमंत संगीतकार आणि गायक कोण आहेत? या ५ स्टार्सची एकूण संपत्ती किती आहे.
बॉलीवूडमध्ये अनेक गायकांचे करोडो चाहते आहेत. पण सर्वात श्रीमंत संगीतकार कोण आहेत? ए. आर. रहमान यांच्यापासून ते अरिजित सिंग आणि हनी सिंगपर्यंत, हे पाच दिग्गज आज करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार या पाच श्रीमंत गायकांची एकूण संपत्ती किती आहे?
26
ए. आर. रहमान
ए. आर. रहमान हे भारतातील सर्वात लोकप्रिय संगीतकारांपैकी एक आहेत. अलीकडच्या दिवसांत 'रामायण' या सिनेमातील संगीताच्या कामामुळे ते चर्चेत आले आहेत. २०२६ च्या भारतातील सर्वात श्रीमंत संगीतकारांच्या यादीत ए. आर. रहमान पहिल्या स्थानावर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती तब्बल १,८१३ कोटी रुपये आहे.
36
अरिजित सिंग
अरिजित सिंग यांनी आपल्या आवाजाने देशभरातील संगीतप्रेमींच्या मनावर ताबा मिळवला आहे. आजच्या काळात भारतीय गायकांचा उल्लेख होतो, तेव्हा अरिजित सिंग यांचे नाव सर्वात आधी घेतले जाते. अहवालानुसार, अरिजित यांची एकूण संपत्ती सुमारे ४१४ कोटी रुपये आहे. ते दोन तासांच्या एका लाईव्ह कॉन्सर्टसाठी तब्बल १४ कोटी रुपये मानधन घेतात आणि दरमहा सरासरी ६ कोटी रुपये कमावतात.
हरियाणाच्या फरिदाबादमध्ये जन्मलेल्या सोनू निगम यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी वडिलांसोबत स्टेजवर गाणे गाण्यास सुरुवात केली होती. श्रीमंतीच्या बाबतीत सोनू निगम या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. २०२६ च्या अहवालानुसार, त्यांची एकूण संपत्ती ३७० ते ४०० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. सोनू निगम एका गाण्यासाठी १५ ते १८ लाख रुपये फी घेतात.
56
हनी सिंग
भारतात रॅप म्युझिक आणि नव्या शैलीतील गाण्यांचा ट्रेंड आणण्यात यो यो हनी सिंगचा मोठा वाटा आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे करोडो चाहते आहेत. भारतातील श्रीमंत गायकांच्या यादीत हनी सिंग चौथ्या क्रमांकावर येतात. त्यांची एकूण संपत्ती २४६ कोटी रुपये आहे. ते एका लाईव्ह शोसाठी २० ते ३० लाख रुपये घेतात, तर ब्रँड एंडोर्समेंटसाठी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त मानधन घेतात.
66
तुलसी कुमार
श्रीमंत गायकांच्या यादीत तुलसी कुमार पाचव्या क्रमांकावर आहेत. २०१० मध्ये आलेल्या 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' चित्रपटातील 'तुम जो आये जिंदगी में' या गाण्याने त्यांना तुफान लोकप्रियता मिळवून दिली. आज त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला गायिकांपैकी एक आहेत. अहवालानुसार, तुलसी कुमार यांची एकूण संपत्ती २१० कोटी रुपये आहे. त्या एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी ७ ते १० लाख रुपये मानधन घेतात.
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.