TMKOC : तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धाड, नवा Promo पाहिलात?

Published : Aug 14, 2026, 04:47 PM IST
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

सार

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत तुकाराम मुंढे यांच्या एफडीए पथकाकडून धाड टाकण्यात आली आहे. माधवी भिडेच्या घरी पथक पोहोचलं असून संपूर्ण कुटुंब हादरलं आहे. नेमकं काय घडणार?

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील एक लेटेस्ट प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये मुंबई, महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती दाखवण्यात आली आहे. सध्या मुंबईसह महाराष्ट्रभरात औषध व अन्न प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे, यांच्या नेतृत्त्वाखाली हॉटेल, रेस्टॉरेंट्स, झोमॅटो, ब्लिंकिट अशा विविध खाद्यपदार्थ तयार होणाऱ्या आणि स्टोरेज होणाऱ्या ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. हॉटेलमध्ये स्वच्छता, भेसळयुक्त पदार्थ आणि इतर नियम पाळले जात नसतील, तर त्यांच्यावर बेधडक कारवाईचा बडगा सुरू आहे. तुकाराम मुंढे यांच्या याच कारवायांवर आधारित एक प्रोमो तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतही दाखवण्यात आला आहे. मालिकेतील भिडे कुटुंबावर एफडीएची धाड पडल्याचं नव्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे.

गोकुळधाम सोसायटीचे एकमेव अध्यक्ष आत्मराम तुकाराम भिडे यांच्या घरी एफडीएचं पथक दाखल झालं आहे. या पथकाकडून माधवी भिडे यांनी बनवलेल्या लिंबू-मिरचीच्या लोणच्यात काचेचा तुकडा आढळल्याचं सांगण्यात येतं. यावर भिडे पथकाला उत्तरही देताना दिसतात. मागील अनेक वर्षांपासून माधवी लोणचं तयार करते आहे, पण आजपर्यंत अशी घटना कधीही घडली नसल्याचं स्पष्टीकरण भिडे देतात. त्यावर एफडीए पथकाकडून लोणच्यामध्ये काचेचा तुकडा आढळणं साधी गोष्टी नाही, ही अत्यंत गंभीर बाब असून यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो, त्यामुळे तुमचं लायसन्स रद्द करत आहे, असं उत्तर एफडीएकडून दिलं जातं. तसंच भिडे कुटुंबाला याबाबत काहीही बोलायचं असेल, स्पष्टीकरण द्यायचं असेल, तर त्यांनी ऑफिसमध्ये येऊन द्यावं, असंही एफडीएकडून सांगण्यात आलं आहे.

या घटनेने भिडे कुटुंब पूर्णपणे हादरुन गेलं आहे. आता लायसन्स रद्द झाल्यानंतर भिडे काय पाऊल उचलणार, नेमकं लोणच्यात काचेचा तुकडा गेला कसा हे शोधून काढणार का? हे पुढील भागात पाहणं मजेशीर ठरणार आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढेंच्या बेधडक कारवाईचं संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या हॉटेल्स आणि भेसळयुक्त पदार्थांवर बंदी आणली जात आहे. हाच सत्य घटनेचा संदर्भ घेत मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट दाखवला जाणार आहे.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Vidyut Jammwal Hollywood Debut : १५ मिनिटे श्वास रोखून धरला! हॉलिवूड पदार्पणातच विद्युतची कमाल
Vijay Deverakonda iPhone : पैसे असूनही विजय देवरकोंडा नवा आयफोन का घेत नाही?