Shreya Ghoshal : श्रेया घोषालचं नवं गाणं 'बैरी पिया' रिलीज

Published : Sep 28, 2026, 03:21 PM IST
Shreya Ghoshal : श्रेया घोषालचं नवं गाणं 'बैरी पिया' रिलीज

सार

श्रेया घोषालने तिचं नवं इंडिपेंडेंट गाणं 'बैरी पिया' रिलीज केलं आहे. प्लेबॅक सिंगिंगच्या पलीकडे जाऊन स्वतःला एक्सप्लोर करण्याचं स्वातंत्र्य इंडिपेंडेंट म्युझिक देतं, असं ती म्हणाली.

मुंबई : प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने तिचं नवं गाणं 'बैरी पिया' प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. या गाण्याबद्दल बोलताना श्रेया म्हणाली, "माझ्या प्रवासात इंडिपेंडेंट म्युझिकचा खूप मोठा वाटा आहे. कारण प्लेबॅक सिंगिंगच्या नेहमीच्या चौकटीबाहेर जाऊन नवीन गाणी आणि संगीत एक्सप्लोर करण्याचं स्वातंत्र्य मला यातून मिळतं. प्रत्येक इंडिपेंडेंट प्रोजेक्टने मला काहीतरी नवीन दिलं आहे. मग ते संगीतासोबत केलेले प्रयोग असोत, दुसऱ्या कलाकारासोबत काम करणं असो किंवा एखाद्या गाण्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं असो."

ती पुढे म्हणाली, "'बैरी पिया' या गाण्याच्या साधेपणाने आणि चालीने मला भुरळ घातली. या गाण्याचा सॉफ्ट आणि कंटेंपररी फील मला खूप आवडला. इंडिपेंडेंट म्युझिकची हीच गोष्ट मला सर्वात जास्त भावते. यातून मला स्वतःचे वेगवेगळे पैलू शोधण्याचं स्वातंत्र्य मिळतं."

एक खास योगायोग

श्रेयाचं हे नवं गाणं 'युनिव्हर्सल म्युझिक इंडिया'च्या माध्यमातून रिलीज करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, २००२ मध्ये वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी श्रेयाने 'देवदास' चित्रपटातील 'बैरी पिया' या रोमँटिक गाण्यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आणि आज इतक्या वर्षांनंतर तिने त्याच नावाचं, म्हणजेच 'बैरी पिया' हे इंडिपेंडेंट गाणं रिलीज केलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Adnan Sami Citizenship : अदनान सामी भारताचा नागरिक आहे का? गायकाने दिलं गुगलवर सर्वाधिक विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर
Birth Anniversary : लतादीदींच्या ९७ व्या जयंतीनिमित्त जॅकी श्रॉफ आणि पीएम मोदींची भावपूर्ण श्रद्धांजली