छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटासाठी रितेशने जाहीर केली लोगो डिझाईन स्पर्धा

Published : Apr 19, 2025, 11:52 PM ISTUpdated : Apr 19, 2025, 11:53 PM IST
ritesh deshmukh

सार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेता रितेश देखमुख याने डिझायनर्सची मदत मागितली असून लोगो डिझाईन स्पर्धा जाहीर केली आहे.

मुंबई ः बॉलिवूड अभिनेता रितेश देखमुख हा रेड २ या आगामी चित्रपटासाठी तयारी करत आहे. त्याने डिझायनर्ससाठी एका अनोखी स्पर्धा जाहीर केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील राजा शिवाजी नावाच्या चित्रपटासाठी लोगो डिझाईन स्पर्धा जाहीर केली आहे. 

रितेशच्या मुंबई फिल्म कंपनीच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर हा चित्रपट आधारीत आहे. 

त्याने डिझायनर्स आणि आर्टिस्टना रोमन इंग्रजी किंवा देवनागरीत टायटल लोगो डिझाईन करुन देण्याचे आवाहन केले आहे.

त्याने सोशल मीडियावर या स्पर्धेची माहिती देताना सांगितले आहे, की आम्ही, मुंबई फिल्म कंपनी आणि जिओ स्टुडिओ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर चित्रपट तयार करत आहोत. त्याचे नाव राजा छत्रपती आहे. आम्ही डिझायनर्स आणि आर्टिस्टचा शोध घेत आहोत, जे आकर्षक टायटल लोगो तयार करुन देतील. लोगे देवनागरी किंवा रोमन इंग्रजीत हवा. तुम्ही आमच्या अपेक्षेप्रमाणे लोगो डिझाईन करुन दिला तर त्याचा योग्य मोबदला दिला जाईल. 

तुम्ही तयार केलेला लोगो contact@mfco.in वर पाठवा. जय शिवाजी.

PREV

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?