Katrina Kaif : अंबानींच्या गणपती सोहळ्यात कतरिना-विकीची हजेरी, पण वाढलेल्या वजनामुळे अभिनेत्री ट्रोल, चाहत्यांनी सुनावलं

Published : Sep 15, 2026, 02:18 PM IST
Katrina Kaif : अंबानींच्या गणपती सोहळ्यात कतरिना-विकीची हजेरी, पण वाढलेल्या वजनामुळे अभिनेत्री ट्रोल, चाहत्यांनी सुनावलं

सार

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी नुकतीच अंबानींच्या गणपती सोहळ्याला हजेरी लावली. पण, प्रसूतीनंतर वाढलेल्या वजनामुळे कतरिनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यानंतर तिचे चाहते तिच्या समर्थनासाठी पुढे आले.

मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय जोडी आहे. त्यांचे एकमेकांवरील प्रेम आणि केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. नुकताच त्यांच्या आयुष्यात मुलगा विवान कौशलच्या जन्मानंतर आनंदाचा क्षण आला आहे. अशातच, काल रात्री मुंबईत अंबानींच्या घरी झालेल्या गणपती सेलिब्रेशनमध्ये या जोडीने हजेरी लावली.

कतरिना कैफ झाली ट्रोल

हा सोहळा अनेक सुपरस्टार्सच्या उपस्थितीने झगमगत होता. गणपतीचा उत्साह तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तसाच काहीसा जल्लोष तिथेही होता. पण कतरिना आणि विकीसाठी जो एक छान क्षण असायला हवा होता, मात्र ट्रोलिंग झालं. प्रसूतीनंतर वाढलेल्या वजनावरून ट्रोलर्सनी कतरिनाला लक्ष्य केलं. तिच्या लूकवर अत्यंत वाईट कमेंट्स करण्यात आल्या. पण, तिच्या चाहत्यांनी मात्र ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं.

व्हिडिओ -

ट्रोलर्सनी अशा केल्या कमेंट्स

एका युजरने लिहिलं, “कतरिनाने तिचं सौंदर्य गमावलं आहे.” दुसऱ्याने लिहिलं, “शहनाज गिल कतरिना झालीये आणि कतरिना शहनाज गिल झालीये.” आणखी एकाने कमेंट केली, “चेहऱ्यावर किती सूज आहे... काय झालंय?” तर एकाने लिहिलं, “आता पूर्वीची कतरिना राहिली नाही.. तिचा क्युटनेस आणि चार्म गेलाय..”

चाहते आले धावून

एखादी स्त्री आई झाल्यानंतर तिच्या शरीरावर अशाप्रकारे कमेंट्स करणं, तेही 2026 मध्ये, हे खूपच वाईट आहे. तिच्या खऱ्या चाहत्यांनी मात्र ट्रोलर्सच्या या असंवेदनशीलतेवर सडकून टीका केली. एका चाहत्याने लिहिलं, “या कमेंट सेक्शनमधले पुरुष लग्न करतील किंवा त्यांच्या आयुष्यात कोणीतरी स्त्री असेल, हा विचारच विचित्र आहे. बिचाऱ्या त्या स्त्रिया, देवानेच त्यांना मदत करावी.” दुसऱ्या चाहत्याने लिहिलं, “स्त्रियांना बॉडी शेम करणं थांबवा.” तर आणखी एकाने लिहिलं, “तिने नुकतंच एका बाळाला जन्म दिला आहे! जे कोणी तिला बॉडी शेम करत आहेत, त्यांना लाज वाटायला पाहिजे. तिला तिचं मातृत्व आणि बाळासोबतचा हा सुंदर काळ एन्जॉय करू द्या.”

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Anupama Parameswaran: लग्नाआधीच आई व्हायचीय! 'नटसार्वभौम' फेम अनुपमा परमेश्वरनने सांगितली मनातील इच्छा
Ravi Kishan Garba Video: रवी किशनचा भन्नाट गरबा डान्स व्हायरल, नेटकरी म्हणाले- 'हा तर नवा मीम!'