मनोरंजन डेस्क, kapil sharma rajpal yadav remo dsouza sugandha mishra receive death threats from pakistan । कॉमेडियन कपिल शर्मा, विनोदी अभिनेता राजपाल यादव, कोरियोग्राफर रेमो डिसूझा आणि टीवी शोची विनोदी अभिनेत्री सुगंधा मिश्रा यांना कथितपणे पाकिस्तानातून जीवघेण्या धमक्या मिळाल्या आहेत. मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.
पाकिस्तानातून आलेल्या जीवघेण्या धमकीच्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, ''आम्ही तुमच्या अलीकडील हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. आमच्या मते, एक अतिशय गंभीर बाब तुमच्या निदर्शनास आणणे महत्त्वाचे आहे. हे कोणतेही प्रमोशनल स्टंट किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न नाहीये, आम्ही तुम्हाला हा संदेश अतिशय गांभीर्याने घेण्याची विनंती करत आहोत. चौघांनीही आपली सुरक्षा वाढवावी, आम्ही तुम्हाला जे काही करायचे आहे ते करू देणार नाही. ईमेलवर 'बिष्णु' नावाची स्वाक्षरी आहे.