एलॉन मस्कची आई मेय मस्कसोबत जॅकलिन फर्नांडिस सिद्धीविनायक चरणी

Published : Apr 21, 2025, 05:11 PM ISTUpdated : Apr 21, 2025, 05:56 PM IST
जॅकलिन फर्नांडिस आणि माये मस्क

सार

मुंबई - इस्टर संडेच्या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे यावेळी एलॉन मस्कची आई मेय मस्त तिच्यासोबत होती. दोघींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मुंबई - इस्टर संडेच्या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे यावेळी एलॉन मस्कची आई मेय मस्त तिच्यासोबत होती. दोघींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 यावेळी जॅकलिनने सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तसेच दर्शन घेताना तिने डोके दुपट्ट्याने झाकले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दोघी गणपतीचे दर्शन घेताना दिसत असून पुजारी त्यांना आशिर्वाद देताना दिसत आहेत.

एलॉन मस्कची आई मेय मस्क सध्या भारतात आहे. ए वुमन मेक्स ए प्लान या त्यांच्या पुस्तकाचे भारतात प्रकाशन करण्यासाठी त्या आल्या आहेत.

त्यांच्या दौर्याविषयी बोलताना जॅकलिन म्हणाली, की पुस्तक प्रकाशनासाठी माझी मैत्रिण मेय मस्क भारतात आल्या आहेत. त्यांच्यासोबत गणपतीचे दर्शन घेण्याचा योग आला. हा खूप अद्भूत अनुभव होता. मेय मस्क यांचे पुस्तक महिला प्रतिकाराचे एका उत्तम उदाहरण आहे. त्यातून मला बरेच काही शिकण्यास मिळाले. विशेष म्हणजे वय हा केवळ एक आकडा आहे. त्यातून आपण आपले उद्देश आणि स्वप्नांकडे बघायला नको हे मला शिकता आले.

आई्च्या मृत्यूनंतर जॅकलिनची ही पहिली पब्लिक व्हिजिट होती. २४ मार्च रोजी जॅकलिनची आई किम फर्नांडिस यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना स्ट्रोक झाला होता. ६ एप्रिल रोजी त्यांचा मृ्त्यू झाला. त्या बहरीनमधील मनामा येथे राहण्यास होत्या. २०२२ मध्येही त्यांना स्ट्रोकचा आघात झाला होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मेय मस्क यांनी ७७ वा वाढदिवस मुंबईत साजरा केला. यावेळी त्यांनी ४० ते ५० जणांची खासगी पार्टीही आयोजित केली होती.

जॅकलिन नुकतीच हतेह या चित्रपटात दिसली होती. रेड २ या अजय देवगण यांच्या चित्रपटातही त्याने स्पेशल डास्न केला होता. द जंगल आणि हाऊसफुल ५ मध्ये ती दिसणार आहे.

--------------------------------

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

नाना पाटेकरांच्या दानशूरपणावर मधुर भांडारकर
Nana Patekar : नाना पाटेकर 'अभिनयाचं पुस्तक'; कॅमेऱ्यापुढचा जादूगार गमावला