Fashion Story: फेस्टिव्हलसाठी करिश्मा कपूरचा लाल रंगातील 'चोगा' लूक व्हायरल!

Published : Jan 01, 2026, 02:07 PM IST
Fashion Story

सार

Fashion Story: बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या नवीन ड्रेसिंग स्टाईलमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लाल रंगाच्या 'चोगा' सेटमधील तिचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जाणून घेऊया तिच्या या फेस्टिव्ह लूकबद्दल...

Fashion Story: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीयांच्या पेहरावात आमूलाग्र बदल होत गेले आहेत. पाश्चात्य फॅशन जगतातील विविध ट्रेंड्स भारतातही मोठ्या प्रमाणात फॉलो केले जातात. त्यामुळे भारतातही पाश्चात्य फॅशन मोठ्या प्रमाणात रूळली आहे. अनेकदा बॉलिवूडच्या कलाकारांनाही या फॅशनसाठी फॉलो केलं जातं. म्हणूनच भारतात अनेक फॅशन शोज् मधून शो स्टॉपर म्हणून या कलाकारांना सहभागी करून घेतलं जातं. सध्या बॉलिवूडची अभिनेत्री करिश्मा कपूर हिने फॅशन जगतात आपला करिश्मा दाखवला आहे.

बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री करिश्मा कपूर पुन्हा एकदा फॅशन जगताचे लक्ष वेधून घेत आहे. एका कार्यक्रमात तिने परिधान केलेला सुंदर 'रेड चोगा सेट' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. साधेपणा आणि राजेशाही थाट यांचा मिलाफ असलेला तिचा हा लूक फॅशनप्रेमींनी उचलून धरला आहे.

राजेशाही थाटात 'चोगा' स्टाईल

करिश्माने प्रसिद्ध डिझायनर पुनीत बलानाच्या कलेक्शनमधील 'सुर्ख लाल चांदी टिल्ला आलिया चोगा सेट' (Surkh Lal Chandi Tilla Alia Choga) निवडला होता. पुनीत हे जयपूरस्थित एक प्रसिद्ध भारतीय फॅशन डिझायनर आहेत.

गडद लाल रंगाच्या या कुर्त्यावर चांदीच्या धाग्यांनी केलेले 'टिल्ला' एम्ब्रॉयडरी वर्क या ड्रेसला एक राजेशाही लुक देत आहे. साधी नेक डिझाइन आणि बाहींवरील छोटी एम्ब्रॉयडरी तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. यासोबत तिने मॅचिंग स्ट्रेट पॅन्ट आणि पारदर्शक शीर दुपट्टा परिधान केला होता. ड्रेसला साजेसे 'फिझी गॉब्लेट' ब्रँडची सुंदर जुतीही करिश्माने घातली होती

किंमत ऐकून चाहते थक्क

दिसायला अगदी साधा वाटत असला तरी या ड्रेसची किंमत थोडी जास्त आहे. डिझायनरच्या वेबसाइटनुसार, या 'रेड चोगा' सेटची किंमत सुमारे 58,300 रुपये आहे. तिने घातलेल्या जुतींची किंमतच सुमारे 4,490 रुपये आहे.

मिनिमल मेकअप, मॅक्सिमम स्टाईल

करिश्माच्या स्टायलिंगचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा साधेपणा. तिने जास्त दागिने टाळून फक्त खडे लावलेले छोटे कानातले घातले होते. अगदी नैसर्गिक मेकअप आणि साधी हेअरस्टाईल तिच्या लूकला पूर्णत्व देत होती.

सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या फोटोंखाली चाहत्यांनी "वय वाढेल तसं सौंदर्य वाढतंय", "खऱ्या अर्थाने फॅशन आयकॉन" अशा अनेक कमेंट्सही केल्या आहेत.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Bollywood Calendar 2026 : जानेवारी ते डिसेंबर, जाणून घ्या बॉलिवूडचा कोणता चित्रपट कधी होणार रिलीज
Cine News: असं होतं रश्मिका मंदानाचं 2025... बहिणीसोबतचा सेल्फी झाला व्हायरल