Entertainment: ऑस्करमध्ये देसी गर्लचा जलवा, जगातील टॉप 5 सेलिब्रिटींमध्ये स्थान!

Published : Mar 19, 2026, 10:32 PM IST

Entertainment: 2026 च्या अकादमी अवॉर्ड्स (ऑस्कर) सोहळ्यात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या टॉप 5 सेलिब्रिटींच्या यादीत प्रियांका चोप्राने स्थान मिळवून सर्वांनाच चकित केले आहे. हे यश काही साधंसुधं नाही! जाणून घ्या या देसी गर्लचा प्रवास

PREV
17
देसी गर्ल' प्रियांका चोप्राचा नवा विक्रम
बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये जाऊन तिथेही आपलं वर्चस्व गाजवणारी 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चर्चेत आली आहे. आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये चमकणारी प्रियांका आता प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एका नव्या विक्रमामुळे चर्चेत आहे.
27
टॉप 5 सेलिब्रिटींच्या यादीत प्रियांका चोप्रा

2026 च्या अकादमी अवॉर्ड्स (ऑस्कर) सोहळ्यात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या टॉप 5 सेलिब्रिटींच्या यादीत प्रियांका चोप्राने स्थान मिळवून सर्वांनाच चकित केले आहे.

37
प्रियांकाने पटकावला चौथा क्रमांक
हे EMV प्रकरण आहे तरी काय? 'Lefty.io' या डेटा अ‍ॅनालिटिक्स प्लॅटफॉर्मने एका रिपोर्टनुसार, ऑस्कर सोहळ्यात सेलिब्रिटींनी तयार केलेल्या 'अर्न्ड मीडिया व्हॅल्यू' (EMV) च्या आधारावर ही यादी तयार केली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, कार्यक्रमादरम्यान सोशल मीडियावर कोणत्या सेलिब्रिटीबद्दल सर्वाधिक चर्चा झाली आणि कोणाला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली, हे EMV मोजते. या यादीत प्रियांकाने चौथा क्रमांक पटकावला आहे.
47
टॉप 5 यादीत कोणकोण आहेत?

या टॉप 5 यादीत प्रसिद्ध अभिनेता आणि प्रेझेंटर पेड्रो पास्कल पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने तब्बल 3.3 मिलियन डॉलरची EMV मिळवली. दुसऱ्या क्रमांकावर कायली जेनर (3.1 मिलियन डॉलर) आणि तिसऱ्या क्रमांकावर हॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅन हॅथवे (2.7 मिलियन डॉलर) आहे. आपली प्रियांका चोप्रा 2.2 मिलियन डॉलर (अंदाजे 18 कोटी रुपयांपेक्षा जास्त) मिळवून चौथ्या स्थानावर आहे. तर, पाचव्या स्थानावर झोई सल्डाना आहे.

57
या सोहळ्यासाठी 'फेदर डिटेलिंग' असलेला ड्रेस
या सोहळ्यासाठी प्रियांका चोप्राने पांढऱ्या रंगाचा सुंदर 'फेदर डिटेलिंग' असलेला ड्रेस घातला होता. तिने रेड कार्पेटवर पाऊल ठेवताच सगळ्या कॅमेऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. या कार्यक्रमात तिचा पती आणि गायक निक जोनासनेही तिला साथ दिली.
67
'प्रेझेंटर' म्हणूनही मंचावर
प्रियांका केवळ पाहुणी म्हणूनच नाही, तर 'सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट' (Best Foreign Film) विभागाचा पुरस्कार देण्यासाठी 'प्रेझेंटर' म्हणूनही मंचावर चमकली. हा पुरस्कार 'सेंटिमेंटल व्हॅल्यू' या चित्रपटाला मिळाला.
77
बहुप्रतिक्षित 'वाराणसी' (Varanasi) सिनेमाचे शूटिंग

प्रियांकाच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, ती लवकरच भारताचे गौरवशाली दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित 'वाराणसी' (Varanasi) सिनेमाच्या शूटिंगमध्ये सहभागी होणार आहे. या सिनेमाचं शूटिंग अंटार्क्टिकाच्या 'रॉस आइस शेल्फ'वर होणार आहे. 2027 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. एकंदरीत, जागतिक स्तरावर भारताचं नाव मोठं करणाऱ्या प्रियांकाच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories