Disha Patani - दोन गँगस्टर जे दिशा पटानीच्या बरेली येथील घराबाहेर गोळीबार केल्याच्या घटनेतील आरोपी होते, त्यांना बुधवारी संध्याकाळी दिल्ली पोलिस स्पेशल सेल, उत्तर प्रदेश आणि हरियाणा स्पेशल टास्क फोर्सच्या संयुक्त पथकाने एन्काऊंटरमध्ये ठार केले.
गाझियाबादच्या ट्रॉनिका सिटी येथे झालेल्या या चकमकीत, रोहित गोदारा-गोल्डी ब्रार टोळीशी संबंधित रोहतकचा रविंदर आणि सोनीपतचा अरुण या गँगस्टरना पोलिसांसोबत झालेल्या गोळीबारानंतर कंठस्नान घालण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंदरच्या छातीत गोळी लागली, तर अरुणला मान आणि छातीवर गोळ्या लागल्या. उपचारादरम्यान या दोघांचा मृत्यू झाला.
29
घटनाक्रम
१२ सप्टेंबर रोजी पहाटे ३:३० वाजता दोन व्यक्तींनी मोटरसायकलवरून येऊन दिशा पटानीच्या बरेली येथील घराबाहेर अनेक राऊंड गोळीबार केला होता, त्यानंतर या आरोपींचा शोध सुरू झाला. लवकरच, गोल्डी ब्रारच्या साथीदारांशी जोडलेल्या एका सोशल मीडिया अकाउंटने या घटनेची जबाबदारी स्वीकारली.
39
प्रमोद सिंह कुशवाह यांनी सांगितले की
घटनेबद्दल माहिती देताना, अतिरिक्त पोलिस आयुक्त (स्पेशल सेल) प्रमोद सिंह कुशवाह म्हणाले, "दिल्ली पोलिस स्पेशल सेल, यू.पी. एस.टी.एफ आणि हरियाणा एस.टी.एफ. यांच्या संयुक्त कारवाईत, रोहित गोदारा-गोल्डी ब्रार टोळीचे दोन सक्रिय गुन्हेगार गाझियाबादमधील ट्रॉनिका सिटीजवळ झालेल्या चकमकीत जखमी झाले... हे दोन्ही आरोपी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार घटनेत थेट सहभागी होते."
तपासकर्त्यांनी सांगितले की, दिशा पटानीच्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेजमधून रविंदरची ओळख पटली. त्यानंतर यू.पी. एस.टी.एफने बरेली आणि लगतच्या जिल्ह्यांतील महत्त्वाच्या मार्गांवर त्यांच्या हालचालींचा मागोवा घेतला, तसेच तांत्रिक पाळत ठेवण्यासाठी दिल्ली आणि हरियाणातील गुन्हेगारी डेटाबेसचा वापर केला.
59
असा रचला सापळा
एसीपी धर्मेंद्र सिंह आणि एसआय मनजीत सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी पुष्टी केली की आरोपी गाझियाबाद येथे पोहोचले आहेत. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, "पहाटे ४-५ वाजताच्या सुमारास पथकांना समजले की आरोपी अखेरीस गाझियाबादमध्ये पोहोचले आहेत आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दुपारपर्यंत त्यांचे ठिकाण निश्चित झाले आणि ट्रॉनिका सिटीजवळ सापळा रचण्यात आला."
69
दोघेही गंभीर जखमी झाले होते
संध्याकाळी ७:२० वाजताच्या सुमारास पोलिसांनी त्यांची बाईक अडवली आणि त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. परंतु, आरोपींनी कथितरित्या गोळीबार सुरू केला, ज्यात एक पोलीस अधिकारी आणि एका वाहनाला गोळी लागली. यानंतर पोलिसांनी तातडीने प्रत्युत्तर दिले, ज्यात दोन्ही आरोपी गंभीर जखमी झाले.
79
दिशा पटानीचे घर का होते लक्ष्य?
यू.पी. एस.टी.एफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही टोळी दिशा पटानी आणि तिच्या कुटुंबाकडून खंडणी उकळण्यासाठी अनेक आठवड्यांपासून तिच्या निवासस्थानावर पाळत ठेवत होती. हरियाणा एस.टी.एफचे पोलीस अधीक्षक वसीम अक्रम म्हणाले, "१२ सप्टेंबरच्या बरेली गोळीबार घटनेत हे दोघेच सामील असल्याचा आमच्याकडे ठोस पुरावा होता."
89
अपचारादरम्यान दोघांचा मृत्यू
ते पुढे म्हणाले, "ट्रॉनिका सिटीजवळील एका रस्त्यावर त्यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांनी गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दिले आणि त्यांना पकडले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांचा मृत्यू झाला होता."
अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविंदर २०१४ पासून फतेहाबाद कोर्ट गोळीबार प्रकरणात फरार होता. ५ सप्टेंबर रोजी भिवानी येथे झालेल्या टोळीयुद्धातही तो सामील होता, जिथे हल्लेखोरांनी कोर्टाबाहेर लवजीत नावाच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या होत्या.
99
पोलिसांनाही लागल्या गोळ्या
या चकमकीत चार पोलिस अधिकारीही जखमी झाले. कुशवाह म्हणाले, "या गोळीबारात एसआय रोहितला डाव्या हाताला, तर एचसी कैलाशला उजव्या हाताला गोळी लागली. यू.पी. एस.टी.एफचे दोन हेड कॉन्स्टेबल, अंकुर आणि जय यांनाही दुखापत झाली."
पोलिसांनी सांगितले की, त्यांनी आरोपींकडून चोरीची बाईक, तसेच एक झिगाना पिस्तूल आणि एक ग्लॉक जन ५ पिस्तूल जप्त केले आहे.