Drishyam 3 Box Office : 'दृश्यम 3: द कन्क्लूजन'ची बॉक्स ऑफिसवर हवा, जगभरात कमावले 400 कोटी

Published : Oct 11, 2026, 01:27 PM IST
Drishyam 3 Box Office : 'दृश्यम 3: द कन्क्लूजन'ची बॉक्स ऑफिसवर हवा, जगभरात कमावले 400 कोटी

सार

बॉलिवूडचा 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांचा चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत असून, अवघ्या आठ दिवसांत सिनेमाने 407 कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा सिनेमा 500 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करेल असा अंदाज आहे.

मुंबई : बॉलिवूडचे चाहते 'दृश्यम 3' (दृश्यम द कन्क्लूजन) या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. मोहनलाल यांच्या मल्याळम 'दृश्यम 3' च्या रिलीजनंतर चार महिन्यांनी हा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहता या सिनेमाने त्यांची अजिबात निराशा केलेली नाही. बॉक्स ऑफिसवरही सिनेमाची घोडदौड सुरू आहे. आता 'दृश्यम 3' च्या कमाईचे ताजे आकडे समोर आले आहेत.

सॅकनिल्क (Sacnilk) या ट्रॅकिंग साइटच्या रिपोर्टनुसार, 'दृश्यम 3' ने पहिल्या आठ दिवसांत जगभरात तब्बल 407 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात या सिनेमाने 312 कोटींचे ग्रॉस कलेक्शन आणि 260 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. सिनेमाची ही वेगवान कमाई पाहता, तो लवकरच 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असा अंदाज ट्रेड अ‍ॅनालिस्ट वर्तवत आहेत. 2 ऑक्टोबरला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला. पहिल्या शोपासूनच सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. पहिल्या वीकेंडला बंपर कमाई केल्यानंतर, आता आठवड्याच्या दिवशीही सिनेमाची क्रेझ कायम आहे.

मल्याळम ओरिजिनल सिनेमापेक्षा हिंदी रिमेकच्या कथेत काही बदल करण्यात येतील, असे मूळ दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी आधीच स्पष्ट केले होते. हिंदी प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन स्क्रिप्टमध्ये हे बदल केल्याचे त्यांनी सांगितले होते. 'दृश्यम द कन्क्लूजन'चे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. या सिनेमात अजय देवगण, तब्बू, जयदीप अहलावत आणि श्रिया सरन यांच्या मुख्य भूमिका आहेत. मोहनलाल यांच्या मल्याळम 'दृश्यम 3' पेक्षा या हिंदी व्हर्जनची कथा आणि क्लायमॅक्स थोडा वेगळा ठेवण्यात आला आहे.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Salman Khan : 'काही अभिनेत्री स्वतः पैसे देऊन मागून फोटो काढायला लावतात', पापाराझींवर सलमान भडकला
Ambani Family : अंबानी कुटुंबाचं 'देवी शक्ती' सेलिब्रेशन, स्वदेश इरोसला 1 वर्ष पूर्ण; भारतीय हस्तकलेचा सन्मान