Cyber Fraud : 'उरी' फेम अभिनेत्री कीर्ती कुल्हारीला लाखोंचा गंडा, क्रेडिट कार्डमधून पैसे गायब; कसं काय घडलं?

Published : Jul 30, 2026, 05:43 PM IST
Actress Kirti Kulhari

सार

Kirti Kulhari Credit Card Cyber Fraud : अभिनेत्री कीर्ती कुल्हारी सायबर फसवणुकीची शिकार झाली आहे. मुंबईत काही मिनिटांतच तिच्या क्रेडिट कार्डमधून जवळपास अडीच लाख रुपये चोरट्यांनी काढले. पोलीस आणि सायबर सेल या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माता कीर्ती कुल्हारी सायबर फ्रॉडची शिकार झाली आहे. मुंबईच्या अंधेरी भागातील एका मल्टिप्लेक्समध्ये असताना, तिच्या नकळत तिच्या क्रेडिट कार्डमधून लाखो रुपये काढण्यात आले. काही मिनिटांतच अभिनेत्रीच्या अकाऊंटमधून २,४३,८५२ रुपये काढण्यात आले. परदेशातून झालेल्या या संशयास्पद व्यवहाराचा अलर्ट मिळताच कीर्तीने तातडीने बँकेशी संपर्क साधला आणि कार्ड ब्लॉक केलं. या प्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली असून, सायबर सेलकडून डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

अभिनेत्री कीर्ती कुल्हारीसोबत नेमकं काय घडलं?

एफआयआरनुसार, कीर्ती कुल्हारी अंधेरी पश्चिमेकडील फन रिपब्लिक मॉलमधील सिनेपोलिस थिएटरमध्ये होती. त्याचवेळी तिच्या बँकेतून 'एरोमेक्सिको एअरलाइन्स'च्या नावाने २,५२५ अमेरिकन डॉलर्सच्या व्यवहाराचा अलर्ट आला. तिला संशय आल्याने तिने लगेच बँकेच्या हेल्पलाइनवर फोन केला. तेव्हा बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तिच्या क्रेडिट कार्डवरून एकूण चार अनधिकृत व्यवहार झाले आहेत. त्यानंतर, आणखी नुकसान टाळण्यासाठी तिचं कार्ड तातडीने ब्लॉक करण्यात आलं.

कीर्ती कुल्हारीने पोलिसांना काय सांगितलं?

'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' आणि 'मिशन मंगल' सारख्या सिनेमांमधून प्रसिद्ध झालेल्या कीर्तीने आपल्या जबाबात सांगितलं की, "माझ्या क्रेडिट कार्डचा पासवर्ड पूर्णपणे गोपनीय होता आणि मी तो कोणासोबतही शेअर केला नव्हता." प्राथमिक तपासात, कीर्तीचा मोबाईल फोन किंवा कार्ड मालवेअर किंवा स्पायवेअरच्या मदतीने हॅक केलं असावं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आंबोली पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सायबर सेल आता बँक रेफरन्स नंबर, डिजिटल फूटप्रिंट्स आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या चोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे.

करिअरमध्ये काय करतेय कीर्ती?

या घटनेच्या काही काळ आधीच कीर्ती कुल्हारीने तिच्या करिअरबद्दल एक चांगली बातमी शेअर केली होती. निर्माता म्हणून तिच्या पहिल्या फीचर फिल्मचं शूटिंग पूर्ण झाल्याचं तिने सोशल मीडियावर सांगितलं होतं. पोस्टमध्ये तिने लिहिलं होतं की, "प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते, हे मला आयुष्याने शिकवलं आहे." हा प्रोजेक्ट तिच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचंही तिने म्हटलं होतं. एक अभिनेत्री म्हणून ४१ वर्षीय कीर्ती शेवटची हिमेश रेशमियाच्या 'बॅडॲस रवी कुमार' या सिनेमात दिसली होती.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

नाना पाटेकरांच्या दानशूरपणावर मधुर भांडारकर
Nana Patekar : नाना पाटेकर 'अभिनयाचं पुस्तक'; कॅमेऱ्यापुढचा जादूगार गमावला