रस्त्यावर आग लावणाऱ्या युवकावर पोलिसांची कारवाई

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी एका युवकाने रस्त्यावर आग लावून व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील फतेपूर येथे ही घटना घडली.

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर वेगवेगळे प्रकार करतात. त्याचप्रमाणे आता एका युवकाने व्हिडिओसाठी रस्त्यावर आग लावली असून, हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील फतेपूर येथे ही घटना घडली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक युवक राष्ट्रीय महामार्ग-२ वर २०२४ असे लिहिलेले दिसत आहे. कदाचित आग लागण्यासारख्या द्रव्याने त्याने २०२४ असे लिहिले असून, त्यानंतर त्याने लगेचच या २०२४ वर काडीपेटीची काडी टाकली. आग लागताच २०२४ या लिहिलेल्या अक्षरांवर एकदम आग पेटली. एका आलिशान कारला टेकून उभा राहून युवकाने हे कृत्य केले असून, नंतर व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव शेख बिलाल असे आहे. 

उत्तर प्रदेशातील फतेपूर रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग -२ वर ही घटना घडली असून, पेट्रोल टाकून हे कृत्य करण्यात आल्याचे समजते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला असून, त्यानंतर फतेपूर पोलिसांनी या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी युवकाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. एका युवकाने आपल्या महिंद्रा थार गाडीच्या छतावर माती भरली आणि नंतर वाहन रस्त्यावर वेगाने चालवले. रस्त्यावर धूळ उडवण्याच्या उद्देशाने युवकाने हे कृत्य केले असून, त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. मेरठच्या मुंडली गावातील इंतजार अली याने हे कृत्य केले होते. त्याच्या या धोकादायक कृत्यामुळे रस्त्याने जाणारे इतर वाहनचालक धोक्यात आले होते.


 

Share this article