समलैंगिकतेमुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे दोन वर्षांपूर्वी कुटुंबियांनी त्याला घराबाहेर काढले होते. तो विवाहित असून तीन मुलांचा बाप आहे असेही पोलिसांनी सांगितले.
१८ महिन्यांत ११ जणांची हत्या करणाऱ्या पंजाबमधील सीरियल किलरला अटक करण्यात आली आहे. होशियारपूर जिल्ह्यातील गडशंकर येथील चौरा गावातील ३२ वर्षीय राम सरूप उर्फ सोधी याला पंजाब पोलिसांनी अटक केली. त्याने हत्या केलेल्या बळींच्या पाठीवर 'धोकेबाज' (फसवणूक करणारा) असे शब्द कोरले होते असे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. ऑगस्ट १८ रोजी किरतपूर साहिब परिसरातील मनाली रोडवर एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाच्या तपासात तो अटक झाला.
समलैंगिकतेमुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे दोन वर्षांपूर्वी कुटुंबियांनी सरूपला घराबाहेर काढले होते. तो विवाहित असून तीन मुलांचा बाप आहे असेही पोलिसांनी सांगितले. ११ पैकी पाच जणांच्या हत्येत त्याचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले आहे. यातील तीन जण रोपारमधील आणि दोन जण फतेहगड साहिब आणि होशियारपूर येथील आहेत. इतर हत्यांबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
त्याचे सर्व बळी पुरुष आहेत. बऱ्याचदा तो आपल्या बळींना दुचाकीवर लिफ्ट देऊन आणि लैंगिक अत्याचार करून त्यांची हत्या करायचा. मागितलेले पैसे न देणाऱ्यांनाही तो आपले बळी बनवत असे पोलिसांनी सांगितले. मोदरा टोल प्लाझावर काम करणारा किरतपूर साहिबचा रहिवासी मनिंदर सिंग (३७), ट्रॅक्टर दुरुस्तीचा कामगार आणि बेगमपूरचा रहिवासी मुकंदर सिंग बिल्ला (३४), १८ ऑगस्ट रोजी हत्या झालेला सनाली यांची ओळख पटली आहे.
सनालीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह मनाली रोडवरील पेट्रोल पंपाजवळील झुडुपात फेकून दिला. रोपार येथील माजी सैनिक आणि एका खाजगी कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचीही त्याने हत्या केली. हत्येनंतर तो बळींच्या पाठीवर 'धोकेबाज' असे लिहायचा असे पोलिसांनी सांगितले. तो दोन पद्धतींनी लोकांची हत्या करायचा. एक म्हणजे कापडाने गळा आवळून आणि दुसरे म्हणजे विटा सारख्या वस्तूंनी डोक्यावर मारून असे पोलिस एसपी नवनीत सिंग महल यांनी सांगितल्याचे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.