
पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे एका आमदाराच्या पुतण्याकडून हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने दुचाकीला उडवले. यामध्ये दुचाकीवरील एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर कळंब येथे झालेल्या अपघातात आमदारांच्या पुतण्यानं बेदरकारपणे दोघांना चिरडलं. मोहिते यांच्या पुतण्याच्या कारने दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार खाली कोसळले. त्यापैकी ओम सुनिल भालेराव याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहितेंचा पुतण्या पुण्याच्या दिशेने जात होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या एका टू-व्हीलरला त्याच्या कारची धडक बसली. अपघात अतिशय भीषण होता. त्यामध्ये दुचाकीचा चुराडा झाला, तर कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे. रात्रीच्या सुमाराच हा अपघात झाला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अपघातानंतर माझा पुतण्या हा कुठेही पळून गेला नाही. शिवाय त्याने मद्यपान ही केले नव्हते. असा दावा आमदार मोहितेंनी केला आहे.
आणखी वाचा :
'राज्यातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या', मनोज जरांगेंची मोठी मागणी