पोलिसांनी एका महिला वकिलांना श्वास चाचणीसाठी फुंकर मारण्यास सांगितले असता, त्यांनी ओठांची शस्त्रक्रिया झाल्याचे सांगून नकार दिला. त्यानंतर रक्त चाचणीसाठी रक्त देण्यास सांगितले असता, त्यांना सुईची भीती असल्याने तेही नाकारले.
मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिस श्वास चाचणी करतात. सर्वसाधारणपणे, बहुतेक लोक या चाचणीला सहकार्य करतात. मात्र, अमेरिकेत घडलेल्या एका घटनेत, श्वास चाचणीला नकार देणाऱ्या एका महिला वकिलाने दिलेले कारण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. ओठांची शस्त्रक्रिया झाल्यामुळे यंत्रात फुंकर मारता येणार नाही, असा तिचा दावा होता.
रशेल टॅन्सी नावाच्या युकेमधील एका वकिलांना मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याच्या संशयावरून पोलिसांनी अडवले. ती त्यावेळी तिच्या रेंज रोव्हरमध्ये ताशी ३२ किलोमीटर वेगाने प्रवास करत होती. पोलिसांनी तिला थांबवून श्वास चाचणीसाठी यंत्रात फुंकर मारण्यास सांगितले. मात्र, तिने नकार दिला आणि ओठांची शस्त्रक्रिया झाल्यामुळे फुंकर मारता येणार नाही, असे पोलिसांना सांगितले.
त्यानंतर, रक्त चाचणीसाठी रक्तनमुना देण्यास सांगितले असता, तिने सुईची भीती असल्याने रक्त देता येणार नाही, असे सांगितले. पोलिसांना सहकार्य न केल्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि तिला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात रशेलने मद्यपान केले नसल्याचा दावा केला, परंतु पोलिसांना सहकार्य न केल्यामुळे तिला दोषी ठरवण्यात आले. लिव्हरपूल मॅजिस्ट्रेट कोर्टाने तिला ४ मार्चपर्यंत तुरुंगवास सुनावला. मात्र, जामीन मिळाल्याने ती सुटली, असे वृत्त आहे.