लाडक्या शेळीचा बदला २.५ कोटींनी!

Published : Nov 06, 2024, 10:08 AM IST
लाडक्या शेळीचा बदला २.५ कोटींनी!

सार

मुलीने प्रेमाने सांभाळलेली शेळी लिलावात विकली गेली आणि नंतर शिजवून खाल्ली गेली. यामुळे मुलीला मानसिक धक्का बसला. न्यायालयाने अधिकाऱ्यांना २.५ कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून मुलीला देण्याचे निर्देश दिले.

मुलीने प्रेमाने सांभाळलेली शेळी. लिलावात ती महागड्या दराने विकली गेली. ही शेळी खरेदी करून खाणाऱ्या अधिकाऱ्यांना २ वर्षांनी आता पोटदुखी सुरू झाली आहे. कारण ही शेळी लिलाव करून, शिजवून खाल्ल्यामुळे २.५ कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून मुलीला द्यावे लागले आहेत, असा न्यायालयाचा आदेश आहे. ही घटना कॅलिफोर्नियातील शास्ता जिल्ह्यात घडली आहे. पण एक शेळी इतकी महाग पडेल याची अधिकाऱ्यांना स्वप्नातही कल्पना नव्हती.

जेसिका लँड यांनी आपल्या मुलीला दुग्धव्यवसाय, शेतीविषयी माहिती देण्यासाठी आणि प्रत्यक्षात अनुभव मिळावा म्हणून एक शेळीचे पिल्लू आणले होते. जीवनाचा धडा शिकवण्यासाठी आणलेली शेळी मुलीच्या लाडकी बनली. या शेळीचे नाव सीडर असे ठेवण्यात आले होते. प्रेमाने सांभाळल्यामुळे शेळी खूपच वाढली होती. या शेळीवर संपूर्ण गावाचे लक्ष होते.

२०२२ मध्ये शास्ता जिल्ह्यात सरकारी सहकार्याने लिलाव आयोजित करण्यात आला होता. स्थानिक अधिकाऱ्याने थेट मुलीने प्रेमाने सांभाळलेली शेळी लिलावात ठेवण्याचे निर्देश दिले. यासाठी ११ वर्षीय मुलगी आणि तिची आई जेसिका यांनी खूप विनंती केली. प्रेमाने सांभाळलेली शेळी लिलावातून वगळण्याची विनंती केली. पण स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनेमुळे कर्मचाऱ्यांनी येऊन शेळीला ओढून नेले.

शेळीसाठी मुलगी आणि तिची आई रडत असतानाही काहीच उपयोग झाला नाही. लिलावापूर्वी मुलीने सांभाळलेली शेळी परत देण्याची विनंती केली. सर्व प्रयत्न निष्फळ ठाले. लिलावात शेळी ९०२ अमेरिकन डॉलरला विकली गेली. शेळी खरेदी करणाऱ्यांकडे शेळी देण्याची विनंती केली. पण हा प्रयत्नही निष्फळ ठाला.

तोपर्यंत शेळीचा लिलाव करणारे अधिकारी खूपच आनंदी झाले होते. शेळी खरेदी झाल्यावर लगेचच तिचे मांस शिजवण्यात आले. या घटनेमुळे मुलीला खूप धक्का बसला. शेळी आता राहिली नाही हे मुलीला पचवता येत नव्हते. यामुळे मुलगी मानसिकदृष्ट्या खचली होती. यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या आईने न्यायालयात धाव घेतली. गेल्या दोन वर्षांपासून कायदेशीर लढा देणाऱ्या मुलीच्या आईला यश मिळाले.

न्यायालय आदेश देईल याआधीच अधिकाऱ्यांनी नुकसानभरपाई देण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार २.५ कोटी रुपये मुलीला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे निर्देश दिले. आता अधिकाऱ्यांनी मोठी रक्कम दंड म्हणून मुलीच्या नावावर जमा केली आहे. पण मुलीला आणि तिच्या आईला या रकमेमुळे काहीच आनंद झालेला नाही. शेळी नसल्याची खंत कायम आहे. हा कायदेशीर लढा पैशासाठी नव्हता, गेल्या २ वर्षांपासून आम्ही लढलो आहोत. हा एक धडा असायला हवा. मुलीच्या मनावर परिणाम झालेली ही घटना सर्व अधिकाऱ्यांसाठी एक इशारा आहे, असे मुलीची आई जेसिका यांनी सांगितले.

PREV

Recommended Stories

Kalyan Crime News : कल्याण पूर्वमध्ये एअर होस्टेसची आत्महत्या, मोबाईलमध्ये सापडल्या धक्कादायक बाबी
Family Court: पोटगी नाकारल्याने संतापलेल्या पत्नीने पतीला मारले, व्हिडिओ व्हायरल