मुंबईत खळबळजनक घटना, ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीमच्या कोनात आढळला चक्क तुटलेल्या बोटाचा तुकडा

Published : Jun 13, 2024, 01:25 PM ISTUpdated : Jun 13, 2024, 02:23 PM IST
Mumbai Ice Cream Case

सार

Mumbai Ice Cream Case: आईस्क्रीम कोनमध्ये बोटाचा तुकडा पाहातच ती महिला ओरडू लागली आणि बेशुद्ध पडली. काहीक्षण तिच्या कुटुंबातील लोकांनाही काहीच समजलं नाही. 

Human Finger Found in Icecream : मुंबईत मुंबईतील मालाड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला आहे. मलाड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी तात्काळ ते मानवी बोट फॉरेन्सिककडे पाठवण्यात आले आहे. आईस्क्रीम ज्या ठिकाणी बनवले आणि पॅक केले त्याचाही शोध घेण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

मलाडमधील एका महिलेने यम्मो कंपनीचं (EMOI) आईस्क्रीम ऑनलाईन मागवले होते. पण तिने ते खायला सुरुवात करताच तिच्या समोर मानवी बोटाचा तुकडा दिसला. आईस्क्रीम कोनमध्ये बोटाचा तुकडा पाहातच ती महिला ओरडू लागली आणि बेशुद्ध पडली. काहीक्षण तिच्या कुटुंबातील लोकांनाही काहीच समजलं नाही. पण त्यांना सर्व प्रकार समजल्यानंतर तात्काळ मलाड पोलीस ठाणे गाठले.

नेमकं काय घडलं?

ओरलेम येथील रहिवासी ब्रेंडन सेराओ (27) यांनी बुधवारी ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे यम्मो कंपनीचा आईस्क्रीम कोन ऑर्डर केला होता. त्या महिलेने सांगितले की, आईस्क्रीम कोनमध्ये सुमारे 2 सेमी लांब मानवी बोटाचा तुकडा होता. सेराओ हे व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्यांनी याबाबत तात्काळ पोलिसांत धाव घेत आपली तक्रार दाखल केली. पोलिसांनी याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे. यम्मो आईस्क्रीम कंपनीविरोधात मलाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आईस्कीम कोनमध्ये आढळलेले मानवी बोट मलाड पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाकडे तपासणीसाठी पाठवले आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

आणखी वाचा :

सर्वोच्च न्यायालयात NTA चा यू-टर्न; ग्रेस मिळालेल्या विद्यार्थ्यांची 23 जूनला री-एग्जाम, आता विद्यार्थ्यांसमोर दोन पर्याय!

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Hyderabad Crime : रियल इस्टेट व्यावसायिकाची निर्घृण हत्या, थरारक घटना CCTV मध्ये कैद (Watch Video)
Gujarat Crime : लज्जास्पद! 6 वर्षीय मुलीसोबत निर्भयासारखा अत्याचार, गुप्तांगात घातला रॉड