Fight Viral Video: ऑटोचालक आणि महिलेचा वाद व्हायरल

दोघांमध्ये तू तू मैं मैं झाली. महिलेने चालकाशी वाद घातला, शिवीगाळ केली आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

ऑटोचालक आणि प्रवाशांमध्ये वाद होणे ही नेहमीचीच बाब आहे. भाड्यावरून, वाहन चालवण्यातील चुकांवरून असे वाद होतात. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका प्रवासी महिलेचा आणि ऑटोचालकाचा वाद झाला आहे. वादादरम्यान महिलेने ऑटोचालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

महिलेने दोन अॅप्सवरून ऑटो बुक केला होता. एक बुकिंग रद्द केल्यामुळे ऑटोचालक महिलेवर रागावला. महिलेने ओला आणि रॅपिडोवरून राईड बुक केली होती. पण ओलावरील बुकिंग रद्द केल्याचा आरोप चालकाने केला. महिलेने मात्र दोन्ही अॅप्सवर भाडे किती आहे ते पाहिले होते, बुकिंग केले नव्हते असे सांगितले.

दोघांमध्ये वाद विकोपाला गेला. महिलेने चालकाला शिवीगाळ केली आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

पवन कुमार या युजरने व्हिडिओ शेअर केला आहे. 'ऑटोचालकाला अशी शिवीगाळ करणे योग्य आहे का?' असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. पोलिसांना मेंशन करून हा व्हिडिओ शेअर केला आहे. बेंगळुरू शहर पोलिसांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. 'तुमचा फोन नंबर आणि घटनेचे ठिकाण इनबॉक्समध्ये पाठवा' असे त्यांनी म्हटले आहे.

व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. महिलेने चिथावणीखोर वर्तणूक केली असे अनेकांनी म्हटले आहे. काहींनी 'राईड रद्द करण्याचा पर्याय असताना चालकाने महिलेला का विचारले?' असा प्रश्नही विचारला आहे.

Share this article