दिल्लीत UPSC करणाऱ्या अंजलीने का केली आत्महत्या?, कारण घ्या जाणून

Published : Aug 04, 2024, 12:02 PM ISTUpdated : Aug 04, 2024, 12:04 PM IST
Anjali Gopnarayan

सार

दिल्लीत अंजली गोपनारायण हिला UPSC परिक्षेचा अभ्यास करताना येणारा मानसिक तणाव आणि इतर अडचणी तिने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिल्या आहेत. त्यामुळे आता तरी सरकारने संवेदशील होऊन या विद्यार्थ्यांच्या समस्य़ाकडे लक्ष द्यावे.

महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC) आणि कारभार सध्या देशभरात चर्चेचा विषय झाला असून त्याचबरोबर दिल्लीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक आणि मानसिक पिळकवणूक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.अशातच अकोल्यातील गंगानगर भागातल्या अंजली गोपनारायण या दिल्लीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीने 21 जुलैला फाशी घेत आत्महत्या केली आहे. तिच्या सुसाईड नोटमध्ये तिने अनेक धक्कादायक बाबींवर प्रकाश टाकला आहे. परीक्षेचा अभ्यास करताना येणारा मानसिक तणाव, शिकवणी वर्ग, घर मालक, वस्तीगृह संचालक आणि यासाठी कार्यरत असलेल्या दलालांकडून होणाऱ्या आर्थिक निवडणुकीवर प्रकाश टाकला आहे.

अंजली गोपनारायण या तरुणीने केली आत्महत्या

अंजली अनिल गोपनारायण तिने काही दिवसांपूर्वी बनवलेली ही रील दिवा असलेली अधिकाऱ्याची गाडी हे तिचं स्वप्न होतंय... अंजली ही अकोल्यातील गंगानगर भागात राहतेय. पोलीस शिपाई असलेल्या वडिलांची मुलगी असणाऱ्या अंजलीने सनदी अधिकारी होण्याचे स्वप्नं‌ पाहत दोन वर्षांपूर्वी दिल्ली गाठली होती. अधिकारी बनल्यानंतर अंबर दिव्याची गाडी घेऊन घरी यावे असं स्वप्न तिने उराशी बाळगले होते. मात्र 23 जुलैला ॲम्बुलन्स गाडीतून आलेला मृतदेहच तिच्या कुटुंबीयांना पहावा लागला आहे. हे खूपच दुर्दैवी आहे.

दिल्लीत जुने राजेंद्रनगरात भाड्याच्या खोलीत घेतली फाशी

21 जुलैला अंजलीने दिल्लीतील राहत असलेल्या जुने राजेंद्रनगर भागातील आपल्या भाड्याच्या खोलीत फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. अभ्यास आणि परीक्षेमुळे येणारा ताण-तणाव, सध्या या परीक्षांमध्ये होणारे गैरव्यवहार, शिकवणी वर्ग वस्तीगृह आणि दलाल यांच्याकडून होणारी आर्थिक आणि मानसिक पिळवणूक यातून जीवन संपवलंय. आपल्या काळजाच्या तुकड्यांने असा निर्णय घेतल्याने तिच्या कुटुंबियांची सर्व स्वप्न पार विरुन‌ गेली आहेत.

अंजलीच्या 'सुसाईड नोट'मध्ये तिने नेमकं काय लिहिलंय?

सुसाइड नोटमधून स्पष्ट होते की, त्या विद्यार्थिनीला किती मानसिक आणि आर्थिक ताणाचा सामना करावा लागत होता. तिने आपल्या नोटमध्ये लिहिले की, पीजी आणि होस्टेल मालक विद्यार्थ्यांकडून फक्त पैसे उकळत आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना ते परवडू शकत नाही. सुसाइड नोटमध्ये तिने तिच्या आई-वडिलांची माफी मागितली आहे. तिने सांगितले की, तिने खूप प्रयत्न केले परंतु पुढे जाऊ शकली नाही. तिने डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते शक्य झाले नाही. तिचं एकच स्वप्न होता की, ती पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्लिअर करेल. तिने तिच्या सर्व मित्र आणि कुटुंबियांना धन्यवाद दिले आहे, ज्यांनी तिला समर्थन दिले, पण तिला असे वाटत होते की ती असहाय्य आहे.

अव्वाच्यासव्वा हॉस्टेलचे भाडे 

सुसाईट नोटमध्ये तिने मावशीला धन्यवाद दिले आहे, ज्या नेहमीच तिच्या पाठीशी उभी राहिली. तिने सुसाइड नोटमध्ये एक स्माईल देखील काढली आहे आणि म्हटले आहे की तिला माहीत आहे की आत्महत्या हा कोणत्याही समस्येचे समाधान नाही. तिने असेही लिहिले आहे की, पीजी आणि होस्टेलचे भाडे कमी करावे, कारण अनेक विद्यार्थी हे ओझे सहन करू शकत नाहीत.

सरकारने संवेदशील होऊन आतातरी या विद्यार्थ्यांच्या समस्य़ाकडे लक्ष द्यावे हीच माफक अपेक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगासह इतर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांना अभ्यासासाठी अतिशय चांगल्या सुविधा आणि वातावरण असणं आवश्यक आहे. मात्र दिल्लीत अलिकडे या विद्यार्थ्यांसंदर्भात घडलेल्या घटना या विद्यार्थ्यांसाठी अन सरकारसाठी अतिशय दुर्दैवी आहे. या देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेचे भविष्य असणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी सरकार आतातरी संवेदनशील होईल हीच माफक अपेक्षा.

आणखी वाचा : 

टोमॅटो आता 70-80 रुपये नाही तर 50 रुपये किलोने खरेदी करा, कुठून ते जाणून घ्या?

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून