
Tata Consultancy Services (TCS) : भारतातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी Tata Consultancy Services (TCS) आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी २ टक्के म्हणजेच सुमारे १२,२०० कर्मचाऱ्यांना पुढील आर्थिक वर्षात (एप्रिल २०२५ ते मार्च २०२६) कमी करणार आहे. या निर्णयामागे बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची आणि कंपनीला भविष्यासाठी सक्षम करण्याची भूमिका आहे, असं CEO के. कृतिवासन यांनी सांगितलं.
Moneycontrol ला दिलेल्या मुलाखतीत TCS चे CEO के. कृतिवासन म्हणाले, “AI आणि नव्या ऑपरेटिंग मॉडेलमुळे काम करण्याच्या पद्धती झपाट्याने बदलत आहेत. आम्ही मोठ्या प्रमाणावर AI वापरत आहोत आणि भविष्यातील आवश्यक कौशल्यांची तपासणी करत आहोत. अनेक कर्मचाऱ्यांना करिअर ग्रोथसाठी संधी दिल्या गेल्या, मात्र काही भूमिका अशा आहेत ज्या पुन्हा उपयोगात आणणे शक्य नाही. त्यामुळे हा कठीण पण आवश्यक निर्णय घ्यावा लागला.” TCS चा एकूण कर्मचारी वर्ग सुमारे 6.13 लाख इतका आहे. त्यापैकी २ टक्के म्हणजे सुमारे १२,२०० कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. हे कर्मचारी भारतासह अन्य देशांमधील असून, विशेषतः मध्यम आणि वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे.
TCS ने सांगितले की, प्रभावित कर्मचाऱ्यांना नोटिस पिरियड वेतन, अतिरिक्त सेव्हरन्स पॅकेज, विमा लाभ, आणि बाह्य नोकरी शोधण्याच्या संधी (outplacement) दिल्या जातील. AIITEU चे सरचिटणीस सौभिक भट्टाचार्य यांनी सांगितले की, “TCS ने जून-जुलै २०२५ मध्ये जॉईन होणाऱ्या किमान ५०० lateral hires च्या ऑनबोर्डिंगलाही विलंब दिला आहे.”
12 जून 2025 रोजी, TCS च्या Resource Management Group (RMG) ने नवीन ‘बेंच पॉलिसी’ लागू केली. त्यानुसार, प्रत्येक कर्मचाऱ्याने वर्षभरात किमान 225 दिवस बिलेबल (billable) काम केलेले असणे आवश्यक आहे. तसेच कोणीही एका वर्षात ३५ दिवसांपेक्षा अधिक बेंचवर राहू शकत नाही.
एका कर्मचाऱ्याने Moneycontrol ला सांगितले की, “ज्यांना दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बेंचवर आहे, त्यांना HR भेटायला बोलावून राजीनामा देण्यास सांगतात. राजीनामा दिल्यास ३ महिन्यांचे वेतन दिले जाते. मात्र नकार दिल्यास कंपनीकडून थेट सेवा समाप्त केली जाते आणि सेव्हरन्स वेतन दिले जात नाही.”
AI मुळे कर्मचाऱ्यांची गरज कमी झाली यावर CEO कृतिवासन यांनी स्पष्टीकरण दिले की, “हा निर्णय AI मुळे नसून, भविष्यातील योग्य कौशल्ये तयार करण्यासाठी आहे. हे ‘redeployment feasibility’ बद्दल आहे, ‘headcount reduction’ बद्दल नाही.”
विश्लेषकांच्या मते, हा निर्णय केवळ TCS पुरताच मर्यादित राहणार नाही. कंपनीचा AI चा वाढता वापर, testing सारख्या पारंपरिक स्किल्सचा मागासलेला उपयोग, आणि क्लायंट प्रोजेक्ट्सचे लहान व कमी कालावधीचे होणे या सर्वांमुळे ही restructuring पुढील काळात इतर IT कंपन्यांमध्येही पाहायला मिळू शकते.
TCS ने घेतलेला हा निर्णय निश्चितच धक्कादायक आहे, पण भविष्यातील स्पर्धात्मकता टिकवण्यासाठी तो आवश्यक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कौशल्य अपग्रेड, प्रोजेक्टवर कार्यरत असणे, आणि सतत बदलत चाललेल्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे हेच आता TCS च्या कर्मचाऱ्यांसाठी नव्या युगाचे संकेत आहेत.