भारतीय वंशाचे जगदीप सिंग हे एक असे व्यक्ती आहेत ज्यांचा पगार ऐकुन तुम्हाला धक्का बसेल. त्यांचा रोजचा पगार ४८ कोटी रुपये आहे.
जगदीप सिंग हे जगातील सर्वाधिक पगार घेणारे कर्मचारी आहेत. क्वाँटमस्केपचेचे संस्थापक आणि माजी CEO जगदीप यांचे वार्षिक पॅकेज २.३ अब्ज डॉलर म्हणजेच १७,५०० कोटी रुपये आहे.
जगदीप सिंग यांच्या पगाराचा अंदाज यावरून लावता येतो की अनेक मोठ्या कंपन्यांचा वार्षिक महसूल त्याच्या जवळपासही नाही.
क्वांटमस्केपच्या भागधारकांच्या बैठकीत सीईओसाठी २.३ अब्ज डॉलर किमतीचे स्टॉक ऑप्शंस समाविष्ट होते. यामुळेच त्यांचा पगार सुमारे १७,५०० कोटी रुपये होता.
जगदीप सिंग क्वांटमस्केप कंपनीचे संस्थापक आहेत. २०१० मध्ये त्यांनी या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी सॉलिड स्टेट बॅटरी बनवण्याचे काम करते.
क्वांटमस्केपची सॉलिड स्टेट बॅटरी सामान्यत: EV मध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीपेक्षा लक्षणीयरीत्या श्रेष्ठ आहे. याने अधिक रेंज मिळते तसेच चार्जिंग देखील जलद होते.
फोक्सवॅगन आणि बिल गेट्सच्या मायक्रोसॉफ्टने जगदीप सिंग यांच्या कंपनी क्वांटमस्केपमध्येही गुंतवणूक केली आहे.
जगदीप सिंग यांनी कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए केले. त्यांनी १६ फेब्रुवारी २०२४ रोजी कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आणि शिवा शिवराम यांच्याकडे कमांड सोपवली.