Marathi

YouTube Shorts डिसेबल कसं करायचं? ४ सोप्या स्टेप्स

जर तुम्हाला YouTube वर तुमचा वेळ वाचवायचा असेल आणि सततच्या स्क्रोलिंगचा कंटाळा आला असेल, तर तुम्ही आता शॉर्ट्स फीचर सहज डिसेबल करू शकता. याच्या ४ सोप्या स्टेप्स आहेत.
Marathi

शॉर्ट्स स्क्रोलिंगमध्ये वेळ वाया

आजकाल YouTube उघडताच सर्वात आधी शॉर्ट्स व्हिडिओ समोर येतात. अनेकदा आपण फक्त एक व्हिडिओ पाहण्यासाठी जातो, पण शॉर्ट्स स्क्रोल करता करता आपला बराच वेळ निघून जातो.

Image credits: Getty
Marathi

YouTube Shorts कसे हटवायचे?

चांगली गोष्ट म्हणजे, आता YouTube ने मोबाइल ॲपमध्ये शॉर्ट्स जवळपास बंद करण्याचा सोपा मार्ग दिला आहे.  

Image credits: Getty
Marathi

मोबाईलवर शॉर्ट्स बंद करण्याची पद्धत

सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये YouTube ॲप उघडा. आता खाली किंवा वर दिसणाऱ्या तुमच्या प्रोफाइल फोटोवर (DP / You tab) टॅप करा. यानंतर Settings मध्ये जा.

Image credits: Getty
Marathi

इथे दिसेल 'Daily Limits' ऑप्शन

आता इथे तुम्हाला Time Management किंवा Time Management Dashboard हा ऑप्शन मिळेल. यामध्ये तुम्हाला Shorts Feed Limit किंवा Daily Limits दिसेल. त्यावर टॅप करून 0 minutes निवडा.

Image credits: Getty
Marathi

शॉर्ट्स फीड होईल बंद

बस्स, इतकं करताच तुमची शॉर्ट्स फीड जवळपास बंद होईल. आता होम स्क्रीनवर शॉर्ट्स कमी दिसतील आणि शॉर्ट्स टॅब उघडल्यावर “limit reached” असा मेसेज येऊ शकतो.

Image credits: Getty
Marathi

जर ऑप्शन दिसत नसेल तर?

जर तुम्हाला 0 minutes हा ऑप्शन दिसत नसेल आणि फक्त 15 minutes दिसत असेल, तर घाबरू नका. Play Store वरून YouTube ॲप अपडेट करा, ॲप बंद करून पुन्हा उघडा आणि १-२ दिवसांनी पुन्हा तपासा.

Image credits: Getty
Marathi

लॅपटॉप/PC वर काय करायचं?

PC वर शॉर्ट्स पूर्णपणे डिसेबल करण्याचा थेट ऑप्शन सध्या नाही. पण तुम्ही शॉर्ट्स सेक्शनवरील तीन डॉट्सवर (...) क्लिक करून Not Interested / Hide हा पर्याय निवडून ते कमी करू शकता.

Image credits: Getty

Wiggly Bangles: हटके डिझाइनसाठी खरेदी करा या गोल्ड विग्ली बांगड्या

Classy Handbag: अशी फॅशन की नजर हटणार नाही, पाहा क्लासी हँडबॅगच्या 6 हटके डिझाइन्स

Silver Pendant: 4GM चांदीचं पेंडेंट फक्त 500 रुपयांत, चेन आणि नेकलेससाठी बेस्ट ऑप्शन

Period Care: मासिक पाळीतला थकवा घालवा; डाएटमध्ये या पदार्थांचा करा समावेश