उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंत महाकुंभ मेळा भरेल. या महाकुंभात लाखो नागा साधू सहभागी होतील. तसेच हजारो लोकांना नागा साधू बनवले जाईल.
नागा साधू बनवण्याची प्रक्रिया खूपच कठीण आहे. याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. दीक्षा दिल्यानंतरही नागा साधूंना एका लांब प्रक्रियेतून जावे लागते.
दीक्षा दिल्यानंतर नागा साधूंचा लिंग भंग केला जातो. लिंग भंग म्हणजे लिंग कापणे नव्हे. ही एक वेदनादायक प्रक्रिया आहे, ज्यातून प्रत्येक नागा साधूला जावे लागते.
कुंभमेळ्यादरम्यान नवीन नागा साधूंचा गुप्तपणे लिंग भंग करण्याची परंपरा आहे. ही परंपरा रात्री केली जाते ज्यामध्ये फक्त अखाड्यातील लोकच सहभागी होऊ शकतात.