Marathi

दही खूप आंबट होतंय का?

उन्हाळ्यात दुपारपर्यंत दही खूप आंबट होतं का? कितीही काळजी घेतली तरी दही घट्ट लागत नाहीये का? काळजी करू नका!

Marathi

जास्त काळ फ्रेश राहील

दही आंबट होऊ नये आणि मलईसारखं घट्ट जमावं यासाठी काही खास किचन टिप्स आहेत. या टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या घरचं दही जास्त काळ ताजं राहील.

Image credits: Pinterest
Marathi

मातीच्या भांड्याचा वापर

उन्हाळ्यात दही लावण्यासाठी मातीचं भांडं वापरा. यामुळे दही थंड राहतं आणि भांडं अतिरिक्त पाणी शोषून घेतं. त्यामुळे दही घट्ट होतं आणि कमी आंबट लागतं.

Image credits: Pinterest
Marathi

पाणी काढून टाका

दही लागल्यानंतर त्यावर पाणी जमा झालं असेल, तर ते लगेच काढून टाका. याच पाण्यामुळे दही जास्त आंबट होतं.

Image credits: Pinterest
Marathi

थंड ठिकाणी ठेवा

उन्हाळ्यात पसरट भांड्यात दही लावा. 5-6 तासांत दही लागलं की लगेच ते फ्रिजमध्ये किंवा थंड पाण्याच्या भांड्यात ठेवा.

Image credits: Pinterest
Marathi

विरजण लावण्याची पद्धत

दूध जास्त गरम नसावं आणि विरजणही जास्त घालू नका. जर विरजण आंबट असेल, तर दहीसुद्धा आंबटच होणार. त्यामुळे गोडसर विरजण वापरण्याचा प्रयत्न करा.

Image credits: Pinterest

Kitchen Tips: भाज्या न खाणाऱ्या मुलांसाठी 5 पौष्टिक आणि चविष्ट सूप्स!

१०० रुपयात मंगळसूत्राच्या ६ डिझाइन्स खरेदी करा, सोन्याच्या किंमतीला देईल टक्कर

Sun Tan: हातांवरचं टॅनिंग काढण्यासाठी ७ सोपे घरगुती उपाय, त्वचा बनेल चमकदार

Phulkari Bangles: पंजाबी फुलकारी बांगड्यांनी मिळवा कलरफुल आणि फेस्टिव्ह लूक!