Marathi

डिहायड्रेशन: शरीर देतं हे 5 महत्त्वाचे संकेत

जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि चयापचय क्रियेत अडथळा येतो, त्या स्थितीला डिहायड्रेशन म्हणतात. यामुळे शरीराच्या सामान्य कार्यावर परिणाम होतो.

Marathi

पेशींचं कार्य, तापमान नियंत्रण आणि पोषक तत्वांचा पुरवठा

शरीरातील पेशींचं कार्य, तापमान नियंत्रण, पोषक तत्वांचा पुरवठा आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे.

Image credits: Freepik
Marathi

अनेकजण पाणी पिण्याचा कंटाळा करतात

शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दररोज किमान सात ते आठ ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. पण अनेकजण फक्त तहान लागल्यावरच पाणी पितात.

Image credits: Getty
Marathi

पाणी कमी प्यायल्यास डिहायड्रेशनचा धोका वाढतो

नियमितपणे पुरेसं पाणी न प्यायल्यास डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. तुमचं शरीर डिहायड्रेट झालं असेल, तर ते काही लक्षणं दाखवतं. चला, त्याबद्दल जाणून घेऊया.

Image credits: Getty
Marathi

सतत थकवा आणि ऊर्जेची कमतरता

पुरेशी विश्रांती घेऊनही तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, तर हे शरीरातील पाण्याच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. अगदी थोड्या प्रमाणात झालेल्या डिहायड्रेशनमुळेही थकवा वाढू शकतो.

Image credits: Getty
Marathi

अधूनमधून होणारी डोकेदुखी

वारंवार होणारी डोकेदुखी हे डिहायड्रेशनचं एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं. शरीरातील पाण्याच्या असंतुलनामुळे मेंदूवर दाब येऊन डोकेदुखी सुरू होऊ शकते.

Image credits: Freepik
Marathi

लघवीचा गडद पिवळा रंग किंवा कमी लघवी होणे

शरीरात पाण्याची पातळी तपासण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे लघवीचा रंग पाहणे. पाणी कमी प्यायल्यास शरीरातील विषारी द्रव्यांमुळे लघवीचा रंग गडद पिवळा होतो.

Image credits: Getty
Marathi

एकाग्रता आणि स्मरणशक्तीवर परिणाम

अनेक अभ्यासांमधून हे सिद्ध झालं आहे की, डिहायड्रेशनमुळे तुमची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि एकूणच बौद्धिक क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.

Image credits: Getty
Marathi

ऊर्जेची कमतरता किंवा सतत तहान लागणे

पुरेसं पाणी पिऊनही तुम्हाला सतत थकवा किंवा तहान लागत असेल, तर यामागे इलेक्ट्रोलाइट्सचं असंतुलन हे एक कारण असू शकतं.

Image credits: Freepik

Cleaning Tips: शर्टच्या कॉलरवरचा काळा मळ या सोप्या टिप्सनी असा करा साफ

Cleaning Tips: वॉशिंग मशीनमधले हट्टी डाग काढण्याच्या 7 सोप्या टिप्स!

Silver Saree Pin Designs: साडीचा पदर होईल सुपर स्टायलिश, हे डिझाइन्स नक्की जिंकतील तुमचं मन

Trendy Footwear: नाजूक पायांसाठी सॉफ्ट आणि स्टायलिश चपला, कमी बजेटमध्ये मिळवा हटके लूक