Marathi

ब्लॅकआउट/युद्धात घरच्या १० स्वस्त पण अत्यावश्यक वस्तू

Marathi

१. टॉर्च आणि अतिरिक्त बॅटरी

ब्लॅकआउटमध्ये सर्वात पहिली गरज असते ती म्हणजे प्रकाशाची. स्वस्त LED टॉर्च आणि भरपूर बॅटरी नेहमी घरात ठेवा.

Image credits: Freepik
Marathi

२. रेडी-टू-ईट अन्न

मॅगी, बिस्किटे, ड्रायफ्रूट्स, मुरमुरा, शेंगदाणे यांसारख्या वस्तू साठवून ठेवा, ज्या गॅसशिवायही चालू शकतात.

Image credits: Freepik
Marathi

३. पिण्याचे स्वच्छ पाणी

कमीत कमी १०-१५ लिटर पाणी घरात ठेवा. बाटल्या नसतील तर बादली किंवा कॅनिस्टरमध्ये साठवा.

Image credits: Gemini
Marathi

४. मेणबत्त्या आणि काड्या-लाइटर

टॉर्च खराब झाल्यास मेणबत्त्या उपयोगी पडतील. या खूप स्वस्त असतात, पण अत्यंत आवश्यक.

Image credits: Pinterest
Marathi

५. पोर्टेबल रेडिओ

इंटरनेट बंद झाल्यास माहितीचा हाच एकमेव मार्ग शिल्लक राहील. छोट्या बॅटरीचे रेडिओ आजही मिळतात. ते विकत घेऊन नक्कीच ठेवा.

Image credits: Getty
Marathi

६. मूलभूत औषधांचा साठा

सर्दी-खोकला, ताप, वेदना, जुलाबाची औषधे, ORS, बँडएड घरात एक छोटा फर्स्ट एड बॉक्स नक्कीच ठेवा.

Image credits: freepik
Marathi

७. पॉवर बँक आणि चार्जिंग वायर

फोनच तुमची लाइफलाइन आहे. एक चांगला पॉवर बँक आणि USB चार्जिंग वायर नेहमी तयार ठेवा.

Image credits: freepik
Marathi

८. स्वच्छता साहित्य

टिशू पेपर, सॅनिटायझर, साबण, सॅनिटरी पॅड यांसारख्या वस्तू नक्कीच ठेवा. ब्लॅकआउटमध्ये स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

Image credits: Social media
Marathi

९. आवश्यक कागदपत्रे आणि रोख रक्कम

आधार, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि थोडी रोख रक्कम.. एका छोट्या फाईलमध्ये हे सर्व ठेवा, जेणेकरून गरज पडल्यास लगेच मिळेल.

Image credits: Freepik
Marathi

१०. धातूचे कंटेनर आणि प्लास्टिक पिशव्या

अन्न आणि पाणी साठवण्यासाठी स्टीलचे डबे आणि मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्या खूप उपयोगी पडतात. या स्वस्त आणि टिकाऊ देखील असतात.

Image credits: Getty

Today Thursday Weather आज गुरुवारी महाराष्ट्रात वादळ, ढगाळ वातावरण आणि उष्णता

Gold Price Today आज गुरुवारी सोने महागले, वाचा पुणे, मुंबईसह या शहरांमधील सोन्याचा दर

उरलेल्या भातापासून बनवा साऊथ स्टाईल कुरकुरीत मुरुक्कु, वाचा Recipe

Gold Rate Today आज बुधवारी मुंबईसह या शहरांमधील सोन्याचे दर