मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे! आठव्या वेतन आयोगाच्या गठणाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन लवकरच वाढणार आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे मोठा वेतनवाढ! लवकरच येणार आहे त्यांच्या पगारातील सुधारणा.
आठव्या वेतन आयोगाच्या गठणाचा निर्णय घेण्यात आले असला तरी अजून आयोग गठीत झाल्याबाबत स्पष्ट चित्र नाही. मात्र लवकरच सर्व माहिती उपलब्ध होईल.
सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत कर्मचार्यांना वाढलेले वेतन आठव्या आयोगाबाबत अंदाज घेण्यात मदत करू शकते.
लेव्हल 1 च्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 18,000 रुपयांवरून वाढ होऊन 21,300 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
लेव्हल 2 च्या कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन 19,900 रुपयांवरून 23,880 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
लेव्हल 3 व 4 च्या कर्मचाऱ्यांचे वेतन देखील वाढणारय. लेव्हल 3 कर्मचाऱ्यांचे वेतन 21,700 वरून 26,040 पर्यंत लेव्हल 4 कर्मचाऱ्यांचे वेतन 25,500 वरून 30,600 पर्यंत पोहोचण्याची शक्यताय.
लेव्हल 5 च्या कर्मचाऱ्यांचे वेतन 29,200 रुपयांवरून 35,040 रुपयांपर्यंत वाढणार आहे. हा निर्णय निश्चितच कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
मोदी सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लवकरच वेतन आयोग गठीत करण्याची आशा आहे, आणि यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार सुधारण्याची मोठी संधी मिळणार आहे.