१४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल. या दिवशी ५ कामे मुळीच करू नयेत. जी व्यक्ती ही कामे करते, त्याचे बुरे दिवस सुरू होऊ शकतात. जाणून घ्या कोणती आहेत ही ५ कामे…
हिंदू धर्मात मकर संक्रांतीला अतिशय पवित्र मानले जाते. या दिवशी कोणत्याही प्रकारचे व्यसन जसे की दारू इत्यादी करू नये. असे केल्याने वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.
ज्योतिषशास्त्रात मकर संक्रांतीला एक पर्व म्हटले आहे. धार्मिक दृष्ट्या याचे विशेष महत्त्व आहे, म्हणून या दिवशी मांसाहाराचे सेवन चुकूनही करू नये.
मकर संक्रांतीला दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. यामुळे पाप कर्मांचा नाश होतो. म्हणून या दिवशी जर कोणी तुमच्याकडे काही मागायला आले तर त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नका.
धर्मग्रंथांमध्ये काही विशिष्ट तिथींना ब्रह्मचर्याचे पालन करण्याबद्दल सांगितले आहे. मकर संक्रांती ही त्यापैकी एक आहे. म्हणून या दिवशी पती-पत्नीने संयमाने राहावे.
मकर संक्रांती हा एक शुभ दिवस आहे, या दिवशी कोणाचाही राग करू नका आणि कोणाचेही मन दुखवू नका. असे करणे योग्य मानले जात नाही आणि यामुळे जवळच्या भविष्यात त्रास होऊ शकतो.