Marathi

मुंबईतील टोलनाक्यांवर पूर्ण टोलमाफी, मुख्यमंत्री शिंदेंनी केली घोषणा

Marathi

रात्री बारा वाजल्यापासून केली जाणार अंमलबजावणी

मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर संपूर्णपणे टोल माफी देण्यात येणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Image credits: social media
Marathi

आजपासून किंवा उद्यापासून आचारसंहिता लागू होणार

आजपासून किंवा उद्यापासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे. 

Image credits: social media
Marathi

कोणत्या वाहनांना टोलमाफी लागू होणार?

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी दिली जाणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे. 

Image credits: social media
Marathi

मुंबईत एमएसआरडीसीने ५५ उड्डाणपुलांची उभारणी केली

मुंबईत एमएसआरडीसीने ५५ उड्डाणपुलांची उभारणी केली. या पुलांचा खर्च वसूल करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर सर्वप्रथम टोलनाके उभारण्यात आले होते.

Image credits: social media
Marathi

महायुती सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक

सध्या सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असल्याचे बोललं जात आहे.

Image Credits: social media